सौंदर्याला बुद्धिमत्तेची जोड देत शेतकऱ्याच्या मुलीनं जिंकला होता 'मिस इंडिया' किताब; कोण आहे सुश्मिता धुमाळ?

Sushmita Dhumal won Miss India Title : करंजखोप येथील शेतकऱ्याच्या कुटुंबात (Farmer Family) जन्मलेल्या सुश्मिता लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या.
Sushmita Dhumal won Miss India Title
Sushmita Dhumal won Miss India Titleesakal
Updated on
Summary

शेतकऱ्याची लेकही सौंदर्य स्पर्धेत सहभागी होऊ शकते. रॅम्प वॉक करू शकते, हे त्यांच्या मनात बिंबवले गेले आणि त्या यशस्वी झाल्या.

Navratri Festival Navdurga : ग्रामीण भागातील महिलांच्या अंगीही मोठे कलागुण असतात. मात्र, त्याला वाव मिळावा लागतो. किंबहुना हा वाव, कलागुण दाखविण्याची संधीही त्यांनी प्रयत्नाने मिळवावी लागते. कोरेगाव तालुक्यातील करंजखोप येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुश्मिता धुमाळ (Sushmita Dhumal) यांनी सौंदर्याला बुद्धिमत्तेची जोड देत आपला प्रवास प्रतिकूल परिस्थितीत सुरू ठेवला आणि चक्क मिस इंडिया (Miss India Title) झाल्या.

Sushmita Dhumal won Miss India Title
Ambabai Mandir : नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 1 लाख 34 हजारहून अधिक भाविकांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन

करंजखोप येथील शेतकऱ्याच्या कुटुंबात (Farmer Family) जन्मलेल्या सुश्मिता लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या, तसेच त्यांना विविध कला आत्मसात करण्याची आवड होती. घरी शेतकरी कुटुंबाचे वातावरण होते; पण त्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर चांगले यश मिळविले. त्यांनी वकिलीची पदवीही मिळविली. शिवाजी विद्यापीठातून पीएचडी मिळविली; पण हरहुन्नरी, कलासक्त असलेल्या अन्‌ व्यवसायाने वकील असलेल्या सुश्मिता धुमाळ यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर सौंदर्य स्पर्धेतही यश मिळविले.

सुश्मिता धुमाळ यांचा जन्म झाला, त्याच वर्षी भारताच्या सुश्मिता सेन यांनी ‘मिस युनिव्हर्स’ हा किताब मिळविला होता. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांचे नाव आवडीने सुश्मिता ठेवले. कॉलेज जीवनातच त्यांनी राजकारणात काही काळ काम केले. त्यानंतर समाजकारणात सक्रिय राहिल्या. त्यानंतर कायद्याचा अभ्यासही पूर्ण केला. हा प्रवास सुरू असताना त्यांना काही मित्र-मैत्रिणींनी तू सौंदर्य स्पर्धेत का सहभागी होत नाहीस, असा सल्ला दिला. सौंदर्य स्पर्धेचा त्यांनी कधी विचार केला नव्हता. मैत्रिणींच्या अपेक्षांचा विचार करून सुश्मिता धुमाळ या सौंदर्य स्पर्धेच्या क्षेत्राकडे वळल्या.

Sushmita Dhumal won Miss India Title
'हिंदू-मुस्लिम भाई-भाई' नारा देऊन कर्दनकाळ असणाऱ्या शत्रूंना आपण जवळ करीत आहोत; संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य

सौंदर्याला बुद्धीची जोड होतीच. एकेक टप्पा पार करत त्यांनी अनेक स्पर्धा जिंकल्या. त्यातून त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. शेतकऱ्याची लेकही सौंदर्य स्पर्धेत सहभागी होऊ शकते. रॅम्प वॉक करू शकते, हे त्यांच्या मनात बिंबवले गेले आणि त्या यशस्वी झाल्या. जयपूर येथे २०२२ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत त्यांनी फॉरएव्हर मिस इंडिया सीझन टूचे आयोजन केले होते.

या स्पर्धेत सुश्मिता धुमाळ सहभागी झाल्या होत्या. त्यांनी देशातील ४६ सौंदर्यवतींना मागे टाकत मिस इंडिया या किताब पटकावला. साताऱ्यातून मिस सातारा, राज्यातून मिस महाराष्ट्र त्यानंतर मिस इंडिया अशी यशस्वी घोडदौड कायम ठेवत अव्वल स्थान पटकावले. सुश्मिता धुमाळ यांना कथ्थक आणि अभियानाची देखील आवड असल्याने या स्पर्धेत त्यांना याचा चांगला फायदा झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.