‘सह्याद्री’वर हॉस्पिटल उभारा; सर्वसाधारण सभेत ठराव

विस्तार वाढीसही सर्वानुमते मान्यता
balasaheb patil
balasaheb patilsakal media
Updated on

मसूर : सह्याद्री साखर कारखाना कार्यस्थळावर सभासद शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारण्यासाठी टनेजच्या प्रमाणात रक्कम घ्यावी, कारखान्याची गाळप क्षमता साडेसात हजारवरून ११ हजार मॅट्रिक टन वाढवावी यांसह सर्व विषय एकमताने सह्याद्री कारखान्याच्या ५१ व्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाले. सहकार व पणनमंत्री तथा पालकमंत्री, सह्याद्री कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील अध्यक्षस्थानी होते.

यशवंतनगर (ता. कऱ्हाड) येथील कारखाना कार्यस्थळावर झालेल्या सभेस जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, महाराष्ट्र राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजी क्षीरसागर, कारखान्याच्या उपाध्यक्षा लक्ष्मी गायकवाड, युवानेते जशराज पाटील, सभापती प्रणव ताटे, माजी सभापती शालन माळी, आनंदराव कोरे, जितेंद्र पवार, माजी उपायुक्त तानाजीराव साळुंखे, सुरेखा जाधव, विनिता पलंगे, वनिता माने, रमेश चव्हाण, दाजी पवार, गोपाळराव धोकटे, डॉ. विजयराव साळुंखे, कारखान्याचे संचालक, सभासद, शेतकरी उपस्थित होते.

कारखाना कार्यस्थळावर सुसज्ज रुग्णालयासाठी प्रतिटन दहा रुपयेप्रमाणे रक्कम घेऊन तातडीने कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी सभासदांनी केली. त्यावर मंत्री पाटील यांनी तुम्हा सभासदांच्या निर्णयासोबत असल्याचे स्पष्ट केले. मंत्री पाटील म्हणाले, ‘‘सह्याद्री कारखाना सभासदांचा आहे. मी चालक आहे. सर्वांच्या सहकार्याने तो प्रगतिपथावर नेत आहे. राज्यातल्या सर्व सहकारी संस्थांचा पाया भक्कम करण्यासाठी शेअरच्या रकमेत वाढ होण्यावर मंत्रिमंडळाचा निर्णय झाला आहे.

कारखान्याची तातडीने विस्तारवाढ होण्यासाठी मंजुरी मिळाली आहे.’’ ऊस तोडीस मजूर पैसे मागतात, या तक्रारीबाबत पाटील म्हणाले, ‘‘प्रत्येक गावाने एकही रुपया न देण्याचा ठराव करावा. काही काळ ऊस तुटायचा नाही; पण थोडं थांबायला शिकलं पाहिजे. ऊस नोंदवलाय. मग त्याच्या तोडीची जबाबदारी कारखान्याची आहे.’’ सभासदांना पाचऐवजी सात किलो साखर व टनेजच्या साखरेत वाढ करावी, अशी मागणी सभासदांनी केली. मानसिंगराव जगदाळे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()