आम्हांला आठ दिवसांचा लॉकडाउन हवाय, व्यापाऱ्यांची मागणी

आम्हांला आठ दिवसांचा लॉकडाउन हवाय, व्यापाऱ्यांची मागणी
Updated on

कऱ्हाड : शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने एक ते आठ सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन करावा, असा प्रस्ताव प्रांताधिकारी, पोलिस यांच्याकडे दिला आहे. शहरातील सराफ, कापड व्यापारी, भांडी व्यापारी, चप्पल व्यापाऱ्यांनी नुकताच प्रांताधिकारी उत्तम दिघे व पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांना भेटून प्रस्ताव दिला आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या ट्विटची होतीय चर्चा

त्यावर महसूल आणि पोलिस विभागाने हा प्रस्ताव जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे द्यावा, त्याचा अंतिम निर्णय ते घेतील, असे स्पष्ट केले. त्यामुळे शहरातील व्यापारी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवणार असले, तरी त्यांची जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच त्यावर अंतिम निर्णय ठरेल.

गुड न्यूज : आशा, गटप्रवर्तकांना आता मिळणार मोबाईल  

सराफ व कापड व्यापारी मंगळवारपासून बंद ठेवतील. मात्र, किराणा व औषध व्यापारी अत्यावश्‍यक सेवेत येत असल्याने त्यांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाशिवाय बंदमध्ये सहभागी होता येणार नाही. शहरातील व्यापारी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा प्रस्ताव घेऊन भेटण्यासाठी आले होते, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिली.

कोरोनामुळे साताऱ्यात सर्वाधिक मृत्यू; ज्येष्ठांची संख्या लक्षणीय

दरोडा फसला अन् नागरिकांनी धु-धु धुतला!

व्यापाऱ्यांनी प्रांताधिकारी यांच्याशीही चर्चा झाली आहे. स्वयंस्फूर्त लॉकडाउनाचा व्यापाऱ्यांनी प्रस्ताव जरी दिला असला, तरी त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा होणे गरजेचे आहे, त्यानंतर निर्णय होईल, असे पोलिस निरीक्षक पाटील यांनी व्यापाऱ्यांना स्पष्ट केले आहे.

Edited By : Siddharth Latkar 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.