आमच ठरलं ! आठ सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन

आमच ठरलं ! आठ सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन
Updated on

कऱ्हाड ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील व्यापारी एकवटले आहेत. त्यांनी स्वयंस्फूर्तीने दोन ते आठ सप्टेंबरअखेर सर्व दुकानांसह त्यांचे व्यवहार बंद ठेवून कडक लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. त्यातून अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. मात्र, अन्य कोणत्याही दुकानांचे व्यवहार चालू न ठेवण्याचे आवाहन सर्व व्यापारी संघटनांनी केले आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास हातभार लागणार आहे.
माजी सैनिकांसाठी पुण्यात चालून आलीय सुवर्णसंधी
 
काही दिवसांपासून शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात प्रामुख्याने व्यापारी, सामान्य नागरिकांचे मृत्यू होत आहेत. त्या सर्व स्थितीमुळे जीवन-मरणाचा प्रश्न उद्‌भवला आहे. व्यापारी, सामान्य नागरिक व प्रशासकीय पातळीवर महामारी आटोक्‍यात आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ते प्रयत्न अपुरे पडत आहेत, असे सर्वांचेच मत झाले आहे. त्यामुळे संवेदनशीलपणे कोरोनाची स्थिती पाहून जीव वाचवणे व मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी शहरातील सर्व व्यापारी एकत्र आले आहेत.

कास पठारला जायचं प्लॅनिंग करताय, मग घाई नको.. हे आधी वाचाच

त्यांनी एकत्र येत दोन ते आठ सप्टेंबर या कालावधीत स्वयंस्फूर्तीने सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यास हातभार लागणार आहे, असे व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे. नागरिकांनी गावासाठी घेतलेला निर्णय एकमताने अंमलात आणण्याचे आवाहन प्रत्येक व्यापाऱ्याने केले आहे. त्याला कऱ्हाडकर पाठिंबा देतील, अशी अपेक्षा संघटनांनी व्यक्त केली आहे.

पृथ्वीराज चव्हाणांनी सार्थ ठरवला विश्वास, कऱ्हाडातील रुग्णालये घेणार मोकळा श्वास!

शहरात अत्यावश्‍यक सेवा वेळेचे बंधन घालून सुरू ठेवण्यात येणार आहेत. तरीही आवश्‍यकता असल्यासच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी अत्यावश्‍यक वस्तूंच्या सेवांच्या वेळा ठरविल्या आहेत. त्याबाबत प्रशासकीय पातळीवर सर्व माहिती देण्यात आली आहे.

भरतगाववाडीची तब्बल 229 वर्षांची परंपरा खंडित; गणेशाचा भंडारा रद्द 

बाप्पांच्या विसर्जनासाठी दिवस, वेळेची नोंदणी करा : नगराध्यक्षा नीलम येडगे 

अत्यावश्‍यक सेवा दुकानांच्या वेळा... 

  • किराणा दुकाने व होलसेल व्यापारी : सकाळी 10 ते दुपारी 2 
  • मेडिकल : सकाळी 10 ते दुपारी 2 
  • पेट्रोल पंप : फक्त अत्यावश्‍यक सेवेतील वाहनांसाठी 
  • दूध, भाजीपाला व फळे : सकाळी 7 ते 9 
  • हॉस्पिटल : पूर्ण वेळ सुरू राहणार

    Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.