प्रेमप्रकरणातून कारचालकाने जोराची धडक देत दुचाकीस्वाराला उडविले; नात्यातील महिलेशी नीलेशचे प्रेमसंबंध अन्..

Satara Crime News : विशाल शिंदे याला आपल्या नात्यातील महिलेशी नीलेश जाधव यांचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता.
Satara Crime News
Satara Crime Newsesakal
Updated on
Summary

याप्रकरणी मृत दुचाकीस्वार नीलेश जाधव यांच्या पत्नी पूनम नीलेश जाधव (वय ३३, रा. जळगाव) यांनी येथील पोलिसात फिर्याद दिली आहे.

कोरेगाव : प्रेमप्रकरणाच्या (love Affair) संशयातून कारचालकाने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. नीलेश शंकर जाधव (रा. जळगाव) असे मृताचे नाव आहे. विशाल चंद्रकांत शिंदे (रा. नांदगिरी-खेड, ता. कोरेगाव) असे संशयित कारचालकाचे नाव आहे. कोरेगाव-जळगाव रस्त्यावर शनिवारी कारने जोरदार धडक दिली होती. यात नीलेश जाधव गंभीर जखमी झाले होते.

याबाबत कोरेगाव पोलिसांनी (Koregaon Police) दिलेल्या माहितीनुसार, विशाल शिंदे याला आपल्या नात्यातील महिलेशी नीलेश जाधव यांचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. शनिवारी (ता. १२) दुपारी साडेबाराच्या दरम्यान नीलेश जाधव हे दुचाकीवरून (एमएच ११ डीके ६५४८) कोरेगावावरून जळगावकडे निघाले होते. यादरम्यान ते येथील पाटील हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस रस्त्यावर आलेले असताना पाठीमागून भरधाव आलेल्या विशाल शिंदे याच्या कारने (एमएच ११ सीक्यू ९२५९) दुचाकीला जोराची धडक देऊन उडवले.

Satara Crime News
Hasan Mushrif : 'राजेंनी ईडी लावली म्हणून मला भूमिका बदलावी लागली, नाहीतर..'; मुश्रीफांचा समरजित घाटगेंवर निशाणा

त्यात नीलेश जाधव हे गंभीर जखमी झाले. नीलेश जाधव यांना तातडीने साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, काल दुपारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी मृत दुचाकीस्वार नीलेश जाधव यांच्या पत्नी पूनम नीलेश जाधव (वय ३३, रा. जळगाव) यांनी येथील पोलिसात फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी विशाल चंद्रकांत शिंदे याच्यावर गुन्हा दखल केला आहे. अधिक तपास कोरेगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक घनशाम बल्लाळ करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.