उंब्रजात अवैध धंद्यांवर थेट कारवाई; 23 जणांविरुध्द गुन्हा

छापा टाकून 58 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त
Crime News
Crime Newsesakal
Updated on

उंब्रज (सातारा) : उंब्रजसह परिसरात पोलिसांनी (Umbraj Police) विविध ठिकाणी अवैध धंद्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी आठवडाभरात केलेल्या कारवाईत आठ ठिकाणी छापा टाकून एकूण ५८ हजार ७५५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून २३ गुन्हे दाखल केले आहेत. जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या आदेशानुसार कारवाई सत्र राबवण्यात आले आहे.

Summary

उंब्रजसह परिसरात पोलिसांनी विविध ठिकाणी अवैध धंद्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांची माहिती अशी : उंब्रज पोलिसांनी १ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट दरम्यान विविध ठिकाणी केलेल्या अवैध दारू विक्रीप्रकरणी उंब्रज पोलिस ठाणे (Umbraj Police Station) हद्दीतील संशयास्पद विकास जयवंत चव्हाण (रा. कालगाव), दिगंबर संपत चव्हाण (रा. उंब्रज), अमोल सर्जेराव सोनावले (रा. पाल), राजू बबन सोनावले (रा. चरेगाव), शौकत मुबारक मुलाणी (रा. पेरले), नवनाथ बबन पवार (रा. मसुगडेवाडी), हणमंत प्रल्हाद थोरात (रा. नडशी), सुहास शंकर भिंताडे (रा. जाळगेवाडी), दीपक आनंदराव माने (रा. चरेगाव), रवी श्रीरंग काटे (रा. चाफळ), प्रसाद गजानन खेडेकर (रा. शहापूर), राहुल सोन्याबा सोनावले (रा. कोंजावडे) यांच्यावर कारवाई करून १५ गुन्हे दाखल करून त्यांच्या ताब्यातून सुमारे ५८ हजार ३३६ रुपयांचा अवैध दारूचा माल जप्त करून त्यांचेवर कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

Crime News
शपथविधीसाठी गर्दी जमविल्याप्रकरणी जैन ग्रुपच्या अध्यक्षांविरुध्द गुन्हा

उंब्रज पोलिस ठाणे हद्दीत जुगार खेळणारे यांच्यावर देखील कारवाई करण्यात आलेली असून, यामध्ये संभाजी बाबूराव सूर्यवंशी, अनिल आनंदराव सूर्यवंशी, मानसिंग मारुती सूर्यवंशी, भगवान मधुकर काळे, जनार्दन बाबूराव सूर्यवंशी, संजय शिवराम सूर्यवंशी (सर्व रा. पेरले), भगवान खाशाबा पाटसुते (रा. मसूर), दादासो बळवंत जाधव, भानुदास लक्ष्मण जाधव, गजानन बाळकृष्ण जाधव, दादासो निळकंठ पवार, हणमंत नारायण जाधव, नारायण शंकर जाधव, नवनाथ युवराज जाधव, संजय गणपत क्षीरसागर, राजेंद्र रामचंद्र जाधव (सर्व रा. तारळे), तानाजी किसन सकपाळ, सुरेश तात्याबा सपकाळ, शंकर ज्ञानू सकपाळ, सर्जेराव रामचंद्र सकपाळ, विठ्ठल तुकाराम सकपाळ (सर्व रा. वरची केळवली), सदाशिव जिजाबा भोसले, दादासो बाबू भोसले, मोसीम मुबारक मोमीन, सुनील बापू शेलार (सर्व रा. कोंजावडे), सिकंदर वजीर डांगे (रा. चरेगाव ता. कऱ्हाड), आबासो धोंडिराम गोसावी (रा. चरेगाव), बबन बाळू मोरे, संभाजी बबन माळी, विक्रम बळिराम लोहार, संदीप रामचंद्र भांदिर्गे, महादेव रामचंद्र खरात, नितीन भीमराव सरगडे, वाहिद इसाक मोमीन, दीपक अशोक नागे (सर्व रा. तारळे, ता. पाटण) यांच्यावर एकूण ८ छापे टाकून त्यांच्या ताब्यातून सुमारे ५८ हजार ७५५ रुपयांच्या मुद्देमालासह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कार्यवाही सत्र पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांच्या पथकाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.