कुटुंबीयांनी त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने हकिकत सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
कऱ्हाड : शहरालगतच्या गावात अकरा वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार उघड झाला. त्याप्रकरणी पीडित मुलाच्या नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल झाला. त्यातील दोघांना अटक केली आहे, तर अन्य दोघे अल्पवयीन आहेत. ओम संजय डुबल (वय १९) व प्रसाद महेश कुलकर्णी (१९) अशी पोलिसांनी (Karad Police) अटक केलेल्यांची नावे आहेत.