सातारा : चंदननगर येथील कमानीजवळील रस्त्याच्या मधोमध चारचाकी लावून त्यावर ठेवलेला केक (Cake) कापल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी वैभव चंद्रकांत जाधव (वय ३१, रा. चंदननगर, कोडोली) याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी त्याच्यासह चार जणांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात (Satara City Police Station) गुन्हा नोंद असून, पोलिसांनी तलवारीसह चारचाकी जप्त केली आहे. (Case Registered Against One Person From Chandannagar At Satara City Police Station bam92)
तलवार नाचवतच वैभवने वाढदिवसासाठी आणलेला केक कापत गोंधळ घातला. याबाबतचे व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी शोध घेत वैभव जाधवला ताब्यात घेतले.
चंदननगर येथे वैभव चंद्रकांत जाधव हा राहण्यास आहे. त्याचा काल वाढदिवस होता. यानिमित्त त्याने व त्याच्या मित्रांनी केक कापण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रात्री साडेआठच्या सुमारास वैभव जाधव हा चारचाकीतून चंदननगर येथील कमानीजवळ आला. याठिकाणी वैभव आल्यानंतर त्याच्या साथीदारांनी फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार आरडाओरडा सुरू केला. यानंतर वैभव हा चारचाकीच्या पुढील बाजूस बसला व त्याने तलवार नाचवत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.
तलवार नाचवतच त्याने वाढदिवसासाठी आणलेला केक कापत गोंधळ घातला. याबाबतचे व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी शोध घेत वैभव जाधवला ताब्यात घेतले. याची फिर्याद चंद्रकांत भोसले यांनी नोंदवली आहे. यानुसार वैभव जाधवसह जितेंद्र चव्हाण, गणेश कांबळे, अनिकेत ननावरे, राहुल झणझणे (रा. चंदननगर, कोडोली) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी यानुसार वैभव जाधवला ताब्यात घेत तलवार आणि चारचाकी जप्त केली आहे.
डॉनचा नक्षा उतरवला
वैभव जाधव याने वाढदिवसानिमित्त जोरदार शक्ती प्रदर्शन करत सर्वसामान्यांवर दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. हातात असणारी तलवार नाचवत वैभव स्वत:ला चंदननगरचा डॉन असल्याचे म्हणवून घेत होता. कथित डॉनचा हा धागडधिंगा निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी गतिमान हालचाली करत नगरी डॉनला उचलत त्याची खातरदारी आपल्या पद्धतीने करत त्याचा नक्षा उतरवला.
Case Registered Against One Person From Chandannagar At Satara City Police Station bam92
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.