सातारा : जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून शनिमारुती मंदिर परिसरात वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी बर्थडे बॉयसह 12 जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बर्थडे बॉय विजय किशोर पावटे तसेच अभिराज महेश घोडके, व्यंकटेश धनंजय पावटे, हेम अशोक जानी, रजत महेश घोडके, सिध्दांत किशोर जानी, साहिल गणेश राजोपाध्ये, स्वयंम रोहित गवळी, महेश अरुण कारंजकर, कुणाल गवळी, किरण गवळी, आदित्य गजानन घोडके (सर्व रा. शनिवार पेठ) अशी त्यांची नावे आहेत. हवालदार राहुल दिलीप चव्हाण यांनी याबाबत फिर्याद नोंदविली आहे.
विमान प्रवाशांचा केला सर्व्हे, उत्तरं ऐकून विमान कंपन्यांच्या पायाखालची जमीन सरकली
काेराेनाच्या पार्श्वभुमीवर सातारा जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू आहे. वारंवार पाेलिसांच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी सामाजिक अंतर पाळावे, मास्कचा वापरा करावा असे आवाहन केले जात आहे. ज्यांच्याकडून आदेशाचे भंग हाेत आहे अशांवर गुन्हे दाखल करणे, दंडात्मक कारवाई करणे अशा प्रकारे कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
संपादन : संजय शिंदे
शासकीय कर्मचाऱ्यांनो खिसा रिकामा झालाय, मग 'ही' आहे तुमच्यासाठी गुड न्यूज
शाहुपूरी, गाेडाेली, साेनापूरला सर्वाधिक कोरोनाबाधित; सातारा जिल्ह्यात 141 रुग्ण वाढले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.