सावकारी मोडीत काढण्याचे आव्हान ;शंभूराज देसाई

गृहराज्यमंत्र्यांच्या आदेशानंतर गुन्हे दाखल करण्याची नामुष्की
private Lending Business
private Lending Businesssakal
Updated on

कऱ्हाड : एक, दोन नव्हे तर तब्बल मासिक २० टक्क्यांनी पैसे फिरवणाऱ्या सावकारांची जिल्ह्यात मोठी चलती झाली आहे. कोरोनामुळे बिकट झालेल्या बाजारपेठेतील छोटे व्यापारी, उद्योजकांना ‘टार्गेट’ करून अवैध सावकार त्यांना त्रास देताना दिसताहेत. त्यामुळे खासगी सावकारांची जिल्ह्यात दहशतही वाढली आहे अन्‌ त्यांची उलाढालही दुप्पट झाली आहे. ती मोडीत काढण्यासाठी पोलिसांचा कोणताच ‘अॅक्शन प्लॅन’ नव्हता. मात्र, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलिस खात्याला खासगी सावकारीच्या विषयांवरून धारेवर धरत कारवाईचे आदेश दिल्याने गुन्हे दाखल करण्याचे धाडस पोलिस दाखवताहेत. वास्तविक तीच तत्परता पोलिसांनी अर्जावरून गुन्हे दाखल करण्यात दाखवायला हवी होती. मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर होणाऱ्या जुजबी कारवाईपेक्षा सावकारांच्या दहशतीची पाळेमुळे मोडीत काढण्याचे आव्हान पोलिसांना पेलावे लागणार आहे.

private Lending Business
संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय, आता महिला फाइटर पायलट होणार पर्मनंट

जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात तक्रारी येत असत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत होते. कारवाईपेक्षा सावकारांना संरक्षण दिले जात होते. अनेक पीडित महिलांसह नोकरदार, व्यापारी, उद्योजक थेट पत्रे लिहून व्यथा सांगत होते. मात्र, त्याला पोलिस दल केराची टोपली दाखवत होते. कऱ्हाडातून दोघांना खासगी सावकारांच्या भीतीने गाव सोडण्याची वेळ आली तरीही पोलिस दल हालत नव्हते. मात्र, गृहराज्यमंत्री देसाई यांनी खासगी सावकारांवर कारवाईचे आदेश काय दिले? पोलिस दलाने चपळाई दाखविण्याचा केलेला प्रयत्न त्यांनी पूर्वी आलेल्या खासगी सावकारांविरोधातील तक्रारींकडे केलेल्या दुर्लक्षाला निश्चीतच झाकणारा आहे. मंत्र्यांनी सावकारांवरील रखडलेल्या कारवाईवरून पोलिसांना धारेवर धरले. त्यानंतर पोलिसांनी सहा दिवसांत जिल्ह्यातील १५ खासगी सावरकारांच्या विरोधात गुन्हे दाखल केले. सावकारांच्या मुसक्या आवळून कारवाई केली. मात्र, दुर्दैव एवढेच की, त्यासाठी मंत्र्यांनी आदेश द्यावा लागला. सामान्यांच्या तक्रारीला काहीही किंमत न देणाऱ्या पोलिस दलाची हीच कृती संभ्रमावस्था निर्माण करणारीच आहे. तक्रारदार सातत्याने तक्रारी देत असूनही न होणाऱ्या कारवाईमुळे पीडितही वैतागले होते.

private Lending Business
TRAI कडून मार्चमध्ये 5G साठी शिफारस; 2022 मध्ये सुरु होईल सेवा

खासगी सावकारांची दहशत वाढली आहे. काहींना गाव सोडण्याची वेळ आली आहे. काही जण बेपत्ता आहेत. त्याला सावकारांच्या व्याजाचा विळखा कारणीभूत आहे. खर्च भागविण्यासाठी खासगी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची दांडगाव्याने वसुली सुरू आहे. तीही रोखण्याचे आव्हान आहे. यापूर्वी कऱ्हाडला खासगी सावकारांविरोधात चार गुन्हे दाखल आहेत. काही अर्जही चौकशीवर आहेत. त्यात तक्रारदारांनी सावकारांच्या नेटाने होणाऱ्या वसुलीचा उल्लेख केला आहे. त्यामुळे खासगी सावकारांची वसुलीची पद्धत भयावह आहे.

काहींची घरे, जमिनी लिहून घेण्याचाही प्रकार झाला आहे. कुटुंबांसहित आत्महत्येचाही काहींनी इशारा दिला आहे. अशा सगळ्या सावकारांविरोधातील तक्रारींकडे होणारे सोयीस्कर दुर्लक्ष खासगी सावकरांना बळ देणारे आहे. त्यामुळे त्यांची दहशत व व्याजाचा टक्का वाढला आहे.

कारवाई जुजबी ठरू नये

मंत्र्यांच्या आदेशांनतर कारवाईला सरसावलेल्या जिल्हा पोलिस दलाने सावकारांच्या मुसक्या आवळल्या खऱ्या. मात्र, ती कारवाई जुजबी ठरू नये. त्यात सातत्य हवे. अन्यथा मंत्र्यांचा आदेश आला, कारवाई झाली, इतकंच त्याचं महत्त्‍व नसावं. अन्यथा पुन्हा खासगी सावकार पुन्हा शिरजोर होणार हे नक्कीच. त्यामुळे खासगी सावकारांची पाळेमुळे खणून कारवाईत सातत्यात ठेवणारी कारवाईच पीडितांसह सामान्यांना दिलासा देणारी ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.