'आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजप सोडतील, अशा आवया उठल्या होत्या; पण..'
केळघर (सातारा) : रांजणे यांची घेतलेली सदिच्छा भेट होती. याला कोणताही राजकीय संदर्भ नाही. भाजपचे सरकार सध्या राज्यात नाही. गेल्या दोन वर्षांपासून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) हे भाजप सोडतील, अशा आवया अनेकवेळा उठल्या. मात्र, शिवेंद्रसिंहराजे यांनी भाजपमध्ये चांगले काम केले आहे. आजही शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये (BJP) आहेत. ते भाजप सोडून गेले नाहीत, हे त्यांचे मोठेपण व भाजपचे यश आहे, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले. आंबेघर येथे जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, वसंतराव मानकुमरे, जिल्हा परिषद सदस्या अर्चना रांजणे, भाजपचे जिल्हा चिटणीस विठ्ठल देशपांडे, गीता लोखंडे, नगरसेवक विकास देशपांडे, दत्तात्रय पवार, तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, रामभाऊ शेलार, मोहनराव कासुर्डे, रामभाऊ शेलार, हरिभाऊ शेलार, मच्छिंद्र क्षीरसागर, बबनराव बेलोशे, जयदीप शिंदे, सागर धनावडे, अंकुश बेलोशे, शिवाजीराव गोरे, भानुदास ओंबळे, सानिया धनावडे, सुरेखा धोत्रे, प्रशांत करंजेकर यांची उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून संघर्ष दाखवून विजय मिळवून इतिहास निर्माण केला आहे. संघर्षावर मात करून रांजणे यांनी मिळवलेला हा विजय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यासाठी आलो होतो. आगामी नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, अशी भावना आहे. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे मतही विचारात घेतले जाईल. याबाबतचा निर्णय देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) घेतील, असं ते म्हणाले. ज्ञानदेव रांजणे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव केला. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यासाठी मुद्दाम आलो आहे. सामान्य कुटुंबातील रांजणे यांचा विजय हा महत्त्वपूर्ण असल्याने त्यांचा सत्कार भाजपच्या वतीने करण्यात आला. मी विद्यार्थी चळवळीतून पुढे आलो असून, संघर्ष करण्याऱ्या व्यक्तींचे मला अप्रूप आहे. त्यामुळे मी रांजणे यांचा सत्कार केला, असंही त्यांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.