Chandrayaan 3 Landing : चांद्रयान मोहीम यशस्वी होताच महिलांनी केली चंद्राची आरती; राष्ट्रगीत म्हणून भारतमातेचाही केला जयघोष

यानाने चंद्रावर सुरक्षित लँडिंग केल्‍यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.
Chandrayaan 3 Landing
Chandrayaan 3 Landingesakal
Updated on
Summary

या मोहिमेच्‍या यशस्वितेसाठी परिश्रम घेतलेल्या संशोधकांचेही अभिनंदन करण्यात आले.

कऱ्हाड : चांद्रयान मोहिमेअंतर्गत (Chandrayaan Mission) यानाने चंद्रावर सुरक्षित लँडिंग केल्‍यानंतर शहरासह तालुक्यात काल सायंकाळी जल्‍लोष करण्यात आला. दरम्यान, मंगळवार पेठेतील महिलांनी चंद्राची आरती करून राष्ट्रगीत (National Anthem) म्हणून भारतमातेचा जयघोष केला.

चंद्राच्‍या कक्षेत यान पोचल्‍यानंतर दक्षिण धुव्रावर काल (बुधवार) सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी यान चंद्रावर उतरल्यानंतर शहरासह तालुक्यातील नागरिकांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.

Chandrayaan 3 Landing
Loksabha Election Update : पक्षांतर करणाऱ्यांची काळजी करू नका, गेले तर काँग्रेसमध्ये जाऊ देत; भाजपच्या वरिष्ठांकडून सक्त सूचना

येथील मंगळवार पेठेतील शीला कुलकर्णी, शारदा धातुंडे, सुमन पाटील, सरोज दाभोळे, अनिता शिंदे व अन्य महिलांनी चंद्राची आरती करून राष्ट्रगीत म्हणून भारतमातेचा जल्लोष केला. त्यानंतर महिला व नागरिकांना पेढे वाटप करण्यात आले. या मोहिमेच्‍या यशस्वितेसाठी परिश्रम घेतलेल्या संशोधकांचेही अभिनंदन करण्यात आले.

Chandrayaan 3 Landing
Chandrayaan 3 Video : विक्रम लँडरमधून कसा दिसतोय चंद्र? 'चांद्रयान-3'ने पाठवला खास व्हिडिओ, पाहा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.