Pune-Satara Highway : पुणे-सातारा महामार्गावरुन प्रवास करताय? मग, ही बातमी आधी वाचा..; वाहतुकीत केलाय बदल

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील वाहतुकीत बदल केला आहे.
Pune-Satara National Highway
Pune-Satara National Highwayesakal
Updated on
Summary

जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. मंगळवारी रात्री बारापासून हा बदल सुरू झाला आहे.

शिरवळ : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग (Pune-Satara National Highway) क्रमांक ४८ वर पुणे व सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या सारोळा (ता. भोर) येथील नीरा-नदीवरील पुलाच्या सातारा बाजूकडील शिंदेवाडी (जि. सातारा) येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.

Pune-Satara National Highway
Koyna Dam : पाण्यासाठी खासदारकी लावली पणाला, मंत्री देसाईंवर फोडलं खापर; आता मुख्यमंत्रीच मिटविणार 'कोयना वाद'

त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील वाहतुकीत बदल केला आहे. जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. मंगळवारी रात्री बारापासून हा बदल सुरू झाला आहे. शिंदेवाडी येथील उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत म्हणजे पुढील आदेश होईपर्यंत पर्यायी मार्गानेच वाहतूक सुरू राहील.

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे खेड शिवापूर ते शेंद्रे (सातारा) येथील काम हे पीएस टोल रोड इन्फ्रा यांच्यामार्फत शिंदे डेव्हलपर्स ही कंपनी काम करणार आहे. वाहतूक मार्गात केलेल्या बदलांसाठी सर्व नागरिकांनी व वाहनचालकांनी नोंद घेऊन पोलिस दलास सहकार्य करावे, असेही अधिसूचनेत नमूद केले आहे.

Pune-Satara National Highway
Road Accident : लग्नाला निघालेल्या चौघांवर काळाचा घाला; अपघातानंतर मोटार पेटून दोघांचा होरपळून मृत्यू, दोघे गंभीर जखमी

अशी घेतली काळजी

  • वाहतूक वळवलेल्या सर्व ठिकाणी दिशादर्शक फलक

  • संबंधित ठिकाणी पोलिस बंदोबस्त नेमला आहे

असा आहे वाहतूक मार्गातील बदल

  1. सातारा बाजूकडून पुण्याला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक ही शिंदेवाडी फाटा येथून सेवारस्त्याने वळवली आहे.

  2. भोरकडून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक शिंदेवाडी फाटा येथून सेवा रस्त्याने सारोळा पुलाखालून यू-टर्न घेऊन पुणे- सातारा राष्ट्रीय महामार्गाने वळवली आहे.

  3. पुणे बाजूकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक शिंदेवाडी फाटा येथून सेवारस्त्याने वळवली आहे.

  4. पुणे बाजूकडून भोरकडे जाणारी वाहतूक शिंदेवाडी फाटा पास करून पुढे पंढरपूर फाटा शिरवळ येथून यू-टर्न घेऊन शिंदेवाडी फाटा येथून भोरकडे जाईल.

Pune-Satara National Highway
Tasawade Toll Plaza : मिरजहून मुंबईला 55 प्रवासी घेऊन निघालेल्या खासगी बसला भीषण आग; तब्बल 20 लाखांचं नुकसान

काम लवकर व्हावे

शिंदेवाडी येथे भोर व शिरवळ येथे झालेले शहरीकरण व औद्योगीकरणामुळे दाट लोकवस्ती असणारा हा भाग आहे. यामुळे येथे उड्डाणपुलाचे काम सुरू होत असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. हे काम अखंडित सुरू करून लवकरच हे काम पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.