Satara : ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन

पालखी सोहळ्यादरम्यान मार्गावरील पालखी सोहळ्यातील वाहनाखेरीज इतर सर्व वाहने पर्यायी ये-जा करतील, याची इतर वाहनधारकांनी नोंद घ्यावी.
Dnyaneshwar Maharaj Palkhi
Dnyaneshwar Maharaj Palkhiesakal
Updated on
Summary

७ जून ते २१ जून या कालावधीत फलटण ते लोणंद या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.

सातारा : श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा (Dnyaneshwar Maharaj Palkhi) १८ जून ते २३ जून या कालावधीत जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. पालखी सोहळा पुणे (Pune) जिल्ह्यातून सातारा (Satara) जिल्ह्यात १८ जून रोजी पाडेगाव, लोणंद येथे प्रवेश करणार आहे.

त्यानंतर लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या ठिकाणी मुक्काम करून २३ जून रोजी सोलापूर जिल्ह्यात जाणार आहे. या सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्यात आल्याने पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक समीर शेख (Sameer Sheikh) यांनी केले आहे.

पालखी सोहळ्यादरम्यान १७ जून रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते २१ जून रोजी १२ वाजेपर्यंत फलटण येथून नीरा लोणंदकडे येणारी वाहतूक बारामती किंवा वाठार स्टेशन येथून पुण्याकडे शिरगाव घाटातून वळविण्यात येत आहे. १७ जून रोजी सकाळी सहा वाजल्यापासून २० जून रोजी १२ वाजेपर्यंत आदर्की फाटा येथून लोणंदकडे येणारी वाहतूक पालखी सोहळ्यातील येणाऱ्या वाहनाखेरीज इतर वाहनांना बंदी करण्यात येत आहे.

Dnyaneshwar Maharaj Palkhi
Kolhapur Riots : कोल्हापुरात दंगल घडवणाऱ्या दोषी व्यक्तीला सोडणार नाही; अप्पर पोलिस महासंचालकांचा इशारा

१७ जून ते २१ जून या कालावधीत फलटण ते लोणंद या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. २१ जून ते २३ जूनपर्यंत फलटण ते नातेपुते जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. २१ जून ते २३ जूनपर्यंत नातेपुतेकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक माळशिरस, अकलूज, बारामती पूल येथून बारामतीमार्गे पुण्याकडे वळविण्यात येत आहे.

Dnyaneshwar Maharaj Palkhi
Kolhapur : सराफ दुकानात गोळीबार, पिस्तुलाच्या धाकानं पत्नीची बोबडीच वळली; प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरारक अनुभव

२१ जून ते २३ जून या कालावधीत नातेपुतेकडून फलटणमार्गे साताऱ्याकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणेमार्गे दहिवडी-सातारा अशी वळविण्यात येत आहे. नातेपुतेकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक नातेपुते-दहिगाव-जांब- बारामतीमार्गे पुण्याकडे वळविण्यात येत आहे. २२ जून रोजी पालखी सोहळा हा फलटण येथून पुढील बरड येथील मुक्कामी सकाळी सहा वाजता मार्गस्थ होणार आहे.

Dnyaneshwar Maharaj Palkhi
Kolhapur Riots : दंगलीनंतर कोल्हापुरातील परिस्थिती पूर्वपदावर; Internet Service पुन्हा सुरु

या वेळी वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये, म्हणून पालखीतील वाहने फलटण ते पंढरपूर रस्त्याने बरडकडे जाण्याऐवजी फलटण-दहिवडी चौक-कोळकी-शिंगणापूर-तिकाटणे-वडले-पिंप्रद-बरड अशी वळविण्यात येत आहे. पालखी सोहळ्यादरम्यान मार्गावरील पालखी सोहळ्यातील वाहनाखेरीज इतर सर्व वाहने पर्यायी ये-जा करतील, याची इतर वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे समीर शेख यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.