Waghnakh: लंडन वरुन थेट राजधानी साताऱ्यात येणार वाघनखे.. विशेष विमान उद्या दाखल होणार

Tiger nails will be brought to the Chhatrapati Shivaji Museum on Friday: या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा आज पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला.
Shivaji Maharaj's Waghnakhe
Shivaji Maharaj's Waghnakhe sakal
Updated on

Satara: छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे लंडन येथील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम येथून साताऱ्यातील छत्रपती शिवाजी संग्रहालयात शुक्रवार (ता. १९) आणण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा आज पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला.

संग्रहालयातील विविध दालनांना पालकमंत्री देसाई, जिल्हाधिकारी ‍जितेंद्र डुडी व इतर प्रमुख अधिकाऱ्यांसह दालनांची पाहणी करून सूचना केल्या. या वेळी अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी माहिती दिली. विशेष विमानाने वाघनखं साताऱ्यात दाखल होतील.

Shivaji Maharaj's Waghnakhe
Mukhyamantri Tirth Darshan Yojana : तीर्थ दर्शन योजनेचे पुण्य मिळणार चिठ्ठीने; लाभार्थी निवड होणार लॉटरीद्वारे

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात प्रदर्शित केली जाणार असून, ती नागरिकांना पाहण्यासाठी खुली केली जाणार आहेत. या वाघनखांच्या स्वागताचा दिमाखदार सोहळा आयोजित केला आहे. एकूण सात महिने ही वाघनखे शिवाजी महाराज संग्रहालयात असणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला या वाघनखांचे दर्शन घेण्याची संधी मिळावी, यासाठी नेटके नियोजन प्रशासनाने केले आहे.

या वाघनखांचे दर्शन घेण्याची संधी मिळावी, यासाठी नेटके नियोजन प्रशासनाने केले आहे. वाघनखांच्या स्वागत सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या संग्रहालयाची सजावट, विद्युतरोषणाईवरही विशेष भर देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

Shivaji Maharaj's Waghnakhe
Nagar Lok Sabha MockPoll : सुजय विखेंनी आक्षेप घेतलेल्या ४० मतदान केंद्रांवर होणार 'मॉकपोल'; निवडणूक आयोगाचे आदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.