Chhatrapati Agricultural Festival 2023 : शेती औजारे, खते, बियाण्यांसह घरगुती उपकरणेही; कृषी प्रदर्शनास नागरिकांचा प्रतिसाद

स्मार्ट एक्स्पो ग्रुपच्या व्यवस्थापनांतर्गत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्रसमूह, जय सोशल फाउंडेशनच्या वतीने हा महोत्सव आयोजिला असून
satara
satarasakal
Updated on

सातारा - शेती औजारापासून खते, बियाणे, विविध प्रकारची रोपे, घरगुती उपकरणे यासह वाहनेही उपलब्ध असलेल्या जिल्हा परिषदेच्या मैदानावरील छत्रपती महोत्सव २०२३ कृषी प्रदर्शनास नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

स्मार्ट एक्स्पो ग्रुपच्या व्यवस्थापनांतर्गत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्रसमूह, जय सोशल फाउंडेशनच्या वतीने हा महोत्सव आयोजिला असून, २२ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. प्रदर्शनात आज नागरिकांची गर्दी झाली होती. केंद्र शासनाच्या वतीने हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केल्यामुळे या प्रदर्शनात जागर पौष्टिक तृणधान्याचा हे विविध तृणधान्यांचे प्रदर्शनही लक्षवेधक आहे.

या प्रदर्शनामध्ये देशातील दोनशेहून अधिक कंपन्यांच्या वतीने २२५ स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये नामवंत कंपन्यांच्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक बाइक्स, कृषी औजारे, गृहोपयोगी साहित्य, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे विविध फळभाज्या तसेच आले, गहू, ज्वारी, बाजरी, फळे व इतर पदार्थ या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. सामाजिक वनीकरण विभागातर्फे निर्धार हरित महाराष्ट्राचा या संकल्पनेवर परिसरात लागवडीसाठी असणारी वड, पिंपळ, आवळा, जांभूळ आदींची रोपे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.

satara
Satara Politics : दादांची 'दादागिरी' साताऱ्यात चालेल का ? पालकमंत्री पदावरून जोरदार चर्चा ...

प्रदर्शनात जय हिंद ॲग्रो इक्विपमेंट कंपनीची आकर्षक शेती औजारे, पितांबरी कंपनीची उत्पादने, अनंत ट्रेडिंग कार्पोरेशनची आटा चक्की, गॅस गिझर, गॅस शेगड्या लक्ष वेधून घेत आहेत. बजाज कंपनीच्या विविध दुचाकींचा स्टॉल लक्ष वेधून घेत आहे. हेम एजन्सीच्या हेम टीव्हीएसच्या दुचाकी, परदेशी मॉरिस गॅरेज कंपनीचा चारचाकी वाहनांचा स्टॉल, होक्सवॅगन कंपनीचा चारचाकीचा डिस्प्ले विशेष आकर्षण ठरत आहे.

जिल्हा कृषी विभागातर्फे प्रदर्शनात मोठा सहभाग आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने बँकेच्या विविध शेतकरी व ग्राहकांसाठीच्या योजनांचा माहिती देणारा स्टॉलही आहे. शिवाय आयुर्वेदिक औषधे, शेतकऱ्यांना लागणारी खते, बी- बियाणे, अत्याधुनिक औजारे, नवीन जातीची विविध प्रकारची रोपे, सौंदर्य प्रसाधने प्रदर्शनात स्टॉलवर आहेत.

satara
Satara Politics : 'या' मुद्द्यांवरुन साताऱ्याचं राजकारण पेटणार; दोन्‍ही राजेंचा एल्‍गार

विविध मनोरंजनाचे कार्यक्रम

प्रदर्शनात विविध मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजिले आहेत. खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांचा भक्कम पाठिंबा अन्‌ सातारकरांचा प्रतिसाद मिळत आहे. असे आवाहन सहसंयोजक जय सोशल फाउंडेशनचे प्रमुख सागर भोसले, संयोजक सोमनाथ शेटे व रेखा शेटे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.