Sambhai Maharaj : संभाजी महाराजांचा इतिहास पोचवण्यासाठी महानाट्य; खासदार अमोल कोल्हे

छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीपुढे पोचवण्यासाठी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीत एका प्रगत शहरात शिवपुत्र संभाजी महानाट्याचा प्रयोग करणार आहोत.
Dr. Amol Kolhe News
Dr. Amol Kolhe Newsesakal
Updated on
Summary

छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीपुढे पोचवण्यासाठी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीत एका प्रगत शहरात शिवपुत्र संभाजी महानाट्याचा प्रयोग करणार आहोत.

कऱ्हाड - छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीपुढे पोचवण्यासाठी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीत एका प्रगत शहरात शिवपुत्र संभाजी महानाट्याचा प्रयोग करणार आहोत. इतिहास अनुभवायला मिळावा, यासाठी २८ एप्रिलपासून तीन मेपर्यंत हे महानाट्य होणार आहे, अशी माहिती खासदार अमोल कोल्हे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

महानाट्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महानाट्याचे दिग्दर्शक महेंद्र महाडिक, वासू पाटील, दीपक शिंदे, प्रसाद देशपांडे, विनायक कवडे, हेमंत पाटील, दीपक ऐवळे, गणेश केंडे आदी उपस्थित होते. खासदार कोल्हे म्हणाले, ‘‘शिवपुत्र संभाजी महानाट्य ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी कलाकृती आहे. मला कलाकार म्हणून काम करायला आवडते.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करायला मिळणे, ही फार मोठी गोष्ट आहे. त्याच्याएवढे समाधान नाही. इतिहास मांडणे हे फार महत्त्वाचे आहे. ऐतिहासिक सिनेमांचे निर्मिती मूल्य जास्त आहेत. राज्यातील ११४ तालुक्यांमध्ये थिएटरच नाहीत. त्याचाही फटका बसत आहे. बॉलिवूडचा सिनेमा रिलीज होत असताना मराठी सिनेमांना स्क्रीन मिळताना मोठ्या अडचणी येतात. मालिका सिनेमा, नाटक याच्या फार पलीकडील हे महानाट्य आहे.

आपला इतिहास देशपातळीवर पोचवणारा तानाजी हा पहिला सिनेमा आहे. मूळ इतिहासाला धक्का न लावता समाजाचे कोणते नुकसान होणार नाही, याची दक्षता घेतली, की काहीही वाद निर्माण होत नाहीत. भान आणि जबाबदारी जेव्हा आपण पाळतो, ती पुढच्या पिढीपर्यंत इतिहास पोचवण्याची जबाबदारी महत्त्वाची आहे.’’

संभाजी महाराजांवर सिनेमा करणार

छत्रपती संभाजी महाराजांवर भव्यदिव्य सिनेमा होणे काळाची गरज असून, लवकरच आपण ते करणार आहोत. मी शिवपुत्र संभाजी महानाट्य हे त्याचा एक भाग आहे. सिनेमाच्या माध्यमातून त्यांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती खासदार कोल्हे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()