हडपसरमध्ये छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची विटंबना; पुणे, साताऱ्यासह कराडमध्ये हिंदू समाज आक्रमक, 'हा' महामार्ग रोखला

हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या स्मारकाची विकृत मनोवृत्तीच्या माथेफिरुने विटंबना केल्याची घटना उघडकीस आली.
Hindu Community Karad
Hindu Community Karadesakal
Updated on
Summary

काही दिवसांपूर्वी हडपसरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावर झालेली दगडफेक या घटना सामाजिक बंधुतेला काळिमा फासणाऱ्या व सकल हिंदूंचा अपमान करणाऱ्या आहेत.

कऱ्हाड : पुण्यातील हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या स्मारकाची विकृत मनोवृत्तीच्या माथेफिरुने विटंबना केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेच्या निषेधार्थ हिंदू समाजाच्या (Hindu Community) वतीने पुणे-बंगळुरु महामार्गावरील (Pune-Bangalore Highway) कोल्हापूर नाक्यावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. काही काळानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन रास्तारोको थांबवण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज की जय.., तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवराय.. जय भवानी... जय शिवाजी..., या ना अशा घोषणा देत येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर मोर्चास प्रारंभ झाला. हा मोर्चा दत्त चौकातून तहसीलदार कार्यालयासमोरुन कोल्हापूर नाक्यावरुन पंकज हॉटेल समोरील पुणे-बंगळुरु महामार्गावर नेण्यात आला. तिथे रस्त्यावरच ठाण मांडून आंदोलनकर्ते बसल्याने त्या परिसरातील वाहतूक खंडित झाली होती.

Hindu Community Karad
Satara Police : 'पैशांचा पाऊस पाडून देतो'; आमिष दाखवून 36 लाख रुपये लुबाडणाऱ्या काका महाराजाला अटक, 'अंनिस'चीही आक्रमक भूमिका

यावेळी उपस्थितांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुणे शहरात झालेल्या घटनेचा निषेध करुन यापुढे अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून सरकारने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पोलिस उपाधिक्षक अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. एन. पाटील, तालुका पोलिस निरीक्षक जगताप यांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. महामार्ग रोखल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वरोटे यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने वाहतूक पूर्ववत केली.

Hindu Community Karad
Pune : DP रोडवरील अनधिकृत पार्किंग अखेर हटणार; 'त्या' योजनेतील नागरिकांना गाड्या हटवण्याचे महापालिकेचे आदेश

महापुरुषांच्या सन्मानासाठी पुण्यात रास्ता रोको

धायरी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अन्य महापुरुष व राष्ट्रीय प्रतिके यांच्या सन्मानासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात आज शुक्रवारी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पुण्यात नवले ब्रिज, गाडीतळ हडपसर, किवळे याठिकाणी कार्यकर्त्यांनी रास्ता रोखून धरल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Hindu Community Pune
Hindu Community Pune

महापुरुषांचा वारंवार होणारा अपमान, काही दिवसांपूर्वी हडपसरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावर झालेली दगडफेक या घटना सामाजिक बंधुतेला काळिमा फासणाऱ्या व सकल हिंदूंचा अपमान करणाऱ्या आहेत. याचा निषेध करण्यासाठी आणि सामाजिक शांतता, सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारांना दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा देणारा' कायदा पारित करावा, या मागणीसाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याची भावना सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली. नवले ब्रिज येथील रास्ता रोको आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.