कऱ्हाड - छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या माध्यामातून राजकीय इव्हेंट करत सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्दघाटनचा घाट घातला. त्याचा लोकसबेसाठी राजकीय इव्हेंट केला. पुतळ्याचे काम निकृष्ठ दर्जाचे होते. त्यामुळे तो कोसळला त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मीतेलाच धक्का दिला आहे. त्यामुळे त्या विरोधात राज्यभर आम्ही आंदलन करणार आहोत.
मालवणच्या घडलेल्या साऱ्या प्रकरणाची जबाबदारी निश्चीत करावी. त्याची नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना आज येथे केली.