CM Eknath Shinde : लोकसभेची धामधूम संपताच मुख्‍यमंत्री विश्रांतीसाठी दरे गावी मुक्कामी; गावच्या वार्षिक पूजेलाही राहणार उपस्थित

गावाविषयी असलेले प्रेम आणि गावातील प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होण्याचा पायंडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाळला आहे.
Chief Minister Eknath Shinde Dare Mahabaleshwar
Chief Minister Eknath Shinde Dare Mahabaleshwaresakal
Updated on
Summary

लोकसभेच्या निवडणुकीची (Lok Sabha Elections) धामधूम आता संपली आहे. सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे.

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कालपासून तीन दिवस दरे (Dare Mahabaleshwar) या त्यांच्या मूळगावी मुक्कामी आले आहेत. काल दुपारी त्यांचे विशेष हेलिकॉप्टरने दरे येथे आगमन झाले. विश्रांती व शांततेसाठी ते गावी आले असून, गावच्या देवस्थानची वार्षिक पूजाही गुरुवारी होणार आहे, त्यामध्ये ते सहभागी होणार आहेत.

Chief Minister Eknath Shinde Dare Mahabaleshwar
आलमट्टी धरणामुळे सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत येऊ शकतो महापूर? CM शिंदेंनी अधिकाऱ्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

गावाविषयी असलेले प्रेम आणि गावातील प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होण्याचा पायंडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाळला आहे. लोकसभेच्या निवडणुकीची (Lok Sabha Elections) धामधूम आता संपली आहे. सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे. चार जूनला मतदारांचा कौल कोणाला, हे समजणार आहे. त्यामुळे सर्वांच्याच मनात अस्वस्थता वाढली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल (मंगळवार) दुपारी दरे या त्यांच्या मूळगावी तीन दिवस मुक्कामासाठी विशेष हेलिकॉप्टरने दाखल झाले आहेत. विश्रांतीसाठी आणि शांततेसाठी आपण गावी आल्याचे त्यांनी सांगितले. येत्या ३० तारखेला दरे गावच्या देवस्थानची वार्षिक पूजा आहे, त्या पूजेला ते उपस्थित राहणार आहेत.

Chief Minister Eknath Shinde Dare Mahabaleshwar
जूनच्या शेवटच्या आठवड्यात मंत्रिपदाचा विस्तार? आमदार दिलीप मोहितेंच्या कार्यकर्त्यांना मंत्रिपदाचे लागले वेध!

त्यानंतर एक दिवस ते बुलडाण्याला लग्न समारंभाला जाणार आहेत. त्यानंतर ते मुंबईला हेलिकॉप्टरने परत जाणार आहेत. सध्या लोकसभाच्या निकालाची सर्वांना प्रतीक्षा आहे. चार जून रोजी मतदारांनी महायुती की महाविकास आघाडीला कौल दिलाय, हे समजणार आहे. त्यापूर्वी मन:शांती मिळविण्यासाठी मुख्यमंत्री दरे गावी मुक्कामी आहेत. गावात आल्यावर शांतता लाभते, असे त्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.