'त्या' टीकेची दखल घेण्याची गरज वाटत नाही; मुख्याधिकाऱ्यांचं शिंदेंना प्रत्युत्तर

Mahabaleshwar Municipal Corporation
Mahabaleshwar Municipal Corporationesakal
Updated on

महाबळेश्वर (सातारा) : कायदेशीर तरतुदींच्या अधिन राहून काम करणे हे माझे कर्तव्य आहे. नगराध्यक्षांनी (Mayor) दोन तारखेला जी सभा आयोजिली होती. त्या सभेला मी उपस्थित होते; परंतु त्यानंतर तीन तारखेची सभा ही नियमबाह्य असल्याने मी त्या सभेला उपस्थित राहिले नाही. या संदर्भात मी नगराध्यक्षांना पूर्वकल्पना दिली होती. तीन तारखेला नियमबाह्य सभेत (Mahabaleshwar Municipal Corporation Meeting) माझ्यावर कोणी टीका केली. त्याला मी किंमत देत नाही आणि त्या टीकेची दखल घेण्याची आवश्‍यकता मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील (Chief Officer Pallavi Patil) यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. (Chief Minister Pallavi Patil React for Criticism Of Corporator Kumar Shinde Satara Political News)

Summary

नगराध्यक्षांनी घेतलेला निर्णय नियमबाह्य होता. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांना पत्र देऊन आपण 3 जून रोजीच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणार नाही, असे कळविले होते.

नगराध्यक्षांनी घेतलेला निर्णय नियमबाह्य होता. त्यामुळे मुख्याधिकारी यांनी नगराध्यक्षांना पत्र देऊन आपण 3 जून रोजीच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणार नाही, असे कळविले होते. 3 जून रोजीच्या सभेला केवळ तीन नगरसेवक उपस्थित होते. याच सभेत नगराध्यक्षांचे पती नगरसेवक कुमार शिंदे (Corporator Kumar Shinde) यांनी मुख्याधिकारी यांना लक्ष करून त्यांच्यावर टीका केली. या संदर्भात मुख्याधिकारी यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी अशा टीकांची दखल घेण्याची गरज वाटत नाही. मी कोणत्याही कायदेशीर तरतुदींचा भंग केलेला नाही. भंग जर कोणी केला असेल, तर तो नगराध्यक्षांनी केला आहे. नियमबाह्य सभेला उपस्थित राहणे मला बंधनकारक नाही, असे मुख्याधिकारी यांनी सांगितले.

भारीच! स्ट्रॉबेरीच्या महाबळेश्वरात उगवणार इंडोनेशियाचा निळा भात

Chief Minister Pallavi Patil React for Criticism Of Corporator Kumar Shinde Satara Political News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.