पाईपलाइनसाठी खोदलेल्या चरीत बुडून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Siddhesh Sargar
Siddhesh Sargaresakal
Updated on

मसूर (सातारा) : हणबरवाडी-धनगरवाडी योजनेच्या (Hanbarwadi-Dhangarwadi scheme) पाईपलाइनसाठी खोदलेल्या चरीत पावसाचे पाणी साचले होते. शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या मुलाचा त्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना चिखलीत (Chikhali Village) आज दुपारी बाराच्या सुमारास घडली. सिध्देश हणमंत सरगर (Siddhesh Sargar) (वय 12) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. (Child Dies Water Drowning In Chikhali Village Satara Crime News)

Summary

मसूर पूर्व भागात हणबरवाडी-धनगरवाडी योजनेच्या पाईपलाइनचे खुदाईचे काम सुरू आहे.

मसूर पूर्व भागात हणबरवाडी-धनगरवाडी योजनेच्या पाईपलाइनचे (Pipeline) खुदाईचे काम सुरू आहे. चिखली गावानजीक सरगराची टेकडी नावाच्या शिवारात हणबरवाडी-धनगरवाडी योजनेच्या पाईपलाइनसाठी मोठी चर खोदण्यात आली आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे चरीत पाणी साचले आहे.

Siddhesh Sargar
नागरिकांनो, सावधान! साताऱ्यात कोरोना पाठोपाठ डेंग्यू, चिकुनगुनियाचे थैमान

शेळ्या चारण्यासाठी सिध्देश त्या परिसरात गेला होता. त्यादरम्यान अचानकपणे पाय घसरल्याने तो त्या चरीत पडला. पोहता येत नसल्याने सिध्देशचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे चिखली गावात हळहळ व्यक्त होत आहे. हणमंत गणपत सरगर यांनी मसूर पोलिस दूरक्षेत्रात खबर दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रवीण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक युवराज पवार तपास करत आहेत.

Child Dies Water Drowning In Chikhali Village Satara Crime News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()