'कृष्णा'साठी 91 टक्के चुरशीने मतदान; गुरुवारी होणार मतमोजणी

Krishna Sugar Factory
Krishna Sugar Factoryesakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या (Yashwantrao Mohite Krishna Co-operative Sugar Factory) निवडणुकीसाठी शांततेत अन् उत्साहात सरासरी ९१ टक्के मतदारांनी त्यांचा मतदानाचा (Voting) हक्क बजावला आहे. सभासदांचा मतांचा कौल आज पेटीबंद झाल्याने गुरुवारी (ता. एक) त्याचा निकाल बाहेर येणार आहे. त्यामुळे कृष्णा कारखान्याच्या सत्तेच्या चाव्या कोणाकडे असतील त्याची उत्सुकता लागून राहिली आहे. (Citizens 91 Percent Voting For Krishna Sugar Factory Election Satara Political News)

Summary

पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडले.

कृष्णा कारखान्यासाठी (Krishna Sugar Factory Election) सरासरी ९१ टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती निर्णय अधिकारी प्रकाश आष्टेकर (Officer Prakash Ashtekar) व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी (Election Officer Manohar Mali) यांनी दिली. श्री. माळी म्हणाले, ‘‘कारखान्याच्या ४७ हजार १४५ मतदारांपैकी दहा हजार मतदार मृत आहेत. त्यामुळे उर्वरित ३७ हजार १४५ मतदारापैंकी तब्बल ३४ हजार ५३२ मतदारांनी त्यांचा हक्क बजावला आहे. आज सकाळी आठ ते पाच यावेळेत १४८ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले.

Krishna Sugar Factory
काेराेनातून मुक्त झाले अन् ऑक्सिजन मशिनसह मतदानासाठी पाेचले

सकाळपासूनच मतदारांचा उत्साह होता. सकाळी दहापर्यंत सुमारे २१ टक्के, दुपारी १२ पर्यंत ४५, दुपारी दोनपर्यंत ६०, दुपारी चारपर्यंत ७१, तर व सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे ७३ टक्के मतदान झाले. कृष्णा कारखान्याच्या ४७ हजार १४५ मतदारांपैकी दहा हजार मतदार मृत आहेत. मृत मतदारांचा यादीत समावेश असल्याने मतदानाची टक्केवारी कमी दिसत असली, तरी प्रत्यक्षात जे हयात मतदार आहेत. त्यांना विचारात घेतल्यास मतदानाची आकडेवारी ९१ टक्के आहे. कृष्णा कारखान्याचे तीन हजार ६१३ मतदारांनी मतदान केले नाही.

Krishna Sugar Factory
'कृष्णा'च्या निवडणुकीसाठी मतदान उत्साहात सुरु; पाहा फाेटाे

गुरुवारी होणार मतमोजणी

कृष्णासाठी ता. एक जुलै रोजी येथील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी होणार आहे. गुरुवारी सकाळी आठपासून मतमोजमी सुरू होणार आहे. त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी ७४ टेबल मांडले जाणार आहेत. मतमोजणीला ३२५ अधिकारी यांची नियुक्ती केले आहेत. मतमोजणीसाठी फक्त प्राधिकृत मतमोजणी प्रतिनिधी व नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांनाच ओळखपत्र पाहून प्रवेश देण्यात येणार आहे, असे श्री. आष्टेकर यांनी स्पष्ट केले.

Citizens 91 Percent Voting For Krishna Sugar Factory Election Satara Political News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.