'महाबळेश्वर विकासाच्या नावाखाली पैसे खाण्याचं झालंय कुराण'; ठेकेदारांना ना शहराबद्दल आस्था ना पर्यावरणाशी देणंघेणं

महाबळेश्वर शहरासह (Mahabaleshwar) तालुक्यात विविध विकासकामांसाठी सुमारे ३५९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
Mahabaleshwar
Mahabaleshwaresakal
Updated on
Summary

ब्रिटिशांनी महाबळेश्वर शहराची विचारपूर्वक मांडणी केलेली लक्षात येते. शहरातील रस्ते, गटारे लायब्ररी, शाळा, बाग, पाणीपुरवठा योजना या विचारपूर्वक जागा निश्चित करून नियोजन केले होते.

महाबळेश्वर : शहरासह (Mahabaleshwar) तालुक्यात विविध विकासकामांसाठी सुमारे ३५९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. याअगोदर देखील महाबळेश्वर बाजारपेठेसाठी १०० कोटी, विविध योजनेतून कोट्यवधी रुपये महाबळेश्वरच्या विकासासाठी आलेले आहेत; परंतु तरीही महाबळेश्वरचा खरच विकास होत आहे का? हा प्रश्न येथील जनतेला पडला आहे.

ब्रिटिशांनी महाबळेश्वर शहराची विचारपूर्वक मांडणी केलेली लक्षात येते. शहरातील रस्ते, गटारे लायब्ररी, शाळा, बाग, पाणीपुरवठा योजना या विचारपूर्वक जागा निश्चित करून नियोजन केले होते. एवढ्या वर्षांच्या कार्यकाळात पालिकेच्या माध्यमातून देखील त्या वेळप्रसंगी अपग्रेड होत गेल्या. या वेळी स्वायत्त संस्था असल्याने शहरातील प्रतिष्ठित मंडळी निवडून येथील पालिकेच्या माध्यमातून शहरातील उणिवा भरून काढल्या जायच्या.

Mahabaleshwar
Aditya Temple : शिलाहार कालखंडात रूढ झाले 'ब्रह्मपुरी' हे नाव; आदित्य मंदिराला आहे अनोखा इतिहास

कालांतराने शहर वाढत गेले, लोकसंख्या वाढली, रोजगार वाढला व महाबळेश्वर पर्यटन (Mahabaleshwar Tourism) क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होत गेले; परंतु आता महाबळेश्वर शहर हे विकासाच्या नावाखाली पैसे खाण्याचे कुराण झाल्याचे येथील नागरिकांना वाटू लागले आहे. पूर्वी पालिकेच्या माध्यमातून विकासकामे होत असताना नगरसेवक व अधिकारी यांचा स्थानिक ठेकेदारांकडून मिळणार टक्का हा काही प्रमाणात नागरिकांना मान्य देखील असायचा. कारण त्या बदल्यात मतदारांना, मंडळांना शहरातील विविध उत्सवांना देखील त्यानिमित्ताने नेते मंडळींकडून भरघोस मदत व्हायची; परंतु गेल्या दोन तीन वर्षांपासून बाहेरच्या नामांकित ठेकेदारांमार्फत येथे विविध विकासकामे सुरू करण्यात आली.

Mahabaleshwar
Barti Center : 'बार्टी'च्या स्पर्धा परीक्षा केंद्रांना टाळे? घोषणा 365 कोटींच्या निधीची; मंजूर फक्त 75 कोटी रुपये

या ठेकेदारांना ना महाबळेश्वरची माहिती ना शहराबद्दल आस्था ना पर्यावरणाशी काही देणेघेणे. केवळ व्यवसाय म्हणून पाहणाऱ्या ठेकेदारांना येथील पर्यावरण, राहणीमान, सोयी व गैरसोयीची कोणतीही माहिती नाही. त्यामुळे विकासाच्या नावाखाली उलट येथील पर्यावरण धोक्यात येत आहे. सिमेंट कॉँक्रिटच्या रस्त्यांमुळे पाण्याचे स्तोत्र नष्ट होत आहेत, तर कॉँक्रिटच्या गटारांमध्ये कचरा व पाणी साचून रोगराईला आमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात निधी तर येत आहे; परंतु शहराचा विकास होण्याऐवजी शहर बकाल होताना दिसत आहे, ही मोठी शोकांतिका आहे.

नुकतेच १०० कोटींच्या विकासाच्या नावाखाली येथील पेटिट लायब्ररीचा वर्षानुवर्षे टिकलेला येथील मजबूत जांभ्या दगडाची जागा नवीन ठिसूळ जांभ्या दगडाने घेतली, तर बांधकाम देखील बघितले, तर ते गुण्यात आहे का, याबाबत सामान्य नागरिकांना शंका येते. येथील ब्रिटिशकालीन दगडांची खरेतर बातच न्यारी; परंतु नवीन आधुनिक पद्धतीने काम करण्याच्या नादात येथील हेरिटेजचा दर्जा शासन विसरले की काय? हा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. कारण ब्रिटिशकालीन लाल जांभ्या दगडात घडवलेली दोन फूटची गटारे व खोली अवघी दीड फूट असल्याने ही आकर्षक तर होतीच; परंतु कचरा काढायला देखील सोपी होती.

Mahabaleshwar
Mandangad MIDC : मंडणगडात उभारण्यात येणार 850 एकर क्षेत्रात एमआयडीसी; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

त्याचबरोबर या गटारांमध्ये साठलेले पाणी जमिनीत मुरत असल्याने परिसरातील विहिरींना बारमाही पाणी उपलब्ध असायचे हे त्याचे वैशिष्ट्य होते, तर कोरडा कचरा उचलला जात असल्याने शहरात स्वच्छता तर व्हायची; परंतु रोगराई व कीटकांपासून परिसर मुक्त असायचा; परंतु नवीन विकास योजनेत सिमेंट कॉँक्रिटची गटारे दीड फुटापेक्षा कमी व चार फूट खोल केल्याने कचरा उचलणार कोण व साचलेल्या पाण्यात मच्छर झाल्यावर रोगराई वाढणार त्याला जबाबदार कोणाला धरायचे याचे उत्तर मिळावे, असे नागरिकांना वाटत आहे. वास्तविक बाजारपेठेला मिळालेले हेरिटेजचा दर्जा आता प्रशासकीय कार्यकाळात आपोआप पुसून जाणार ही खंत येथील जुन्या जाणकार लोकांना वाटू लागला आहे.

जिल्हाधिकारी लक्ष देतील का?

शहरातून वेण्णा लेक रस्त्यालगतच्या फूटपाथची दयनीय अवस्था, शहरात प्रवेश करण्यासाठी वेण्णा लेक येथील पर्यायी पूल, नेहमी अनेक प्रवासी प्रवास करत असलेल्या आंबेनळी घाटाची दुर्दशा, तसेच पाण्याची स्तोत्र बळकट करण्याऐवजी कसला विकास साधला जातोय, याकडे जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.