कुडाळ (सातारा) : जावळी तालुक्यातील कुडाळ येथे मंजूर असणारे क्रीडा संकुल (Taluka Level Sports Complex) हे कुडाळातच व्हावे, अशी मागणी कुडाळ ग्रामपंचायतीचे सरपंच-उपसरपंच व सदस्यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले (MLA Shivendraraje Bhosale) यांच्याकडे केली आहे. यावेळी जावली पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे, उपसरपंच सोमनाथ कदम व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. (Citizens Demand MLA Shivendraraje Bhosale To Set Up A Sports Complex In Kudal Village Satara Marathi News)
जावळी तालुक्यात लवकरच सुसज्ज तालुकास्तरीय क्रीडा संकुल होणार आहे.
जावळी तालुक्यात लवकरच सुसज्ज तालुकास्तरीय क्रीडा संकुल होणार आहे. सुमारे पाच कोटी रुपये खर्चाच्या या संकुलासाठी एक कोटीचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक (Sports Officer Yuvraj Naik) यांनी दिली. सुमारे दहा वर्षांपूर्वी जावली तालुक्याचे क्रीडासंकुल कुडाळला मंजूर झाले आहे. त्यासाठी जागा देखील मंजूर करण्यात आली. कुडाळ गावठाणमधील एकूण पाच एकर जागा क्रीडा संकुलासाठी मंजूर असून ही जागा संबंधित विभागाकडे वर्ग देखील करण्यात आली आहे. मात्र. तरीही काही दिवसांपूर्वी तालुकास्तरीय क्रीडा संकुलासाठी मेढा व बिभवी या दोन गावांच्या परिसरात अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी करण्यात आली, त्यामुळे कुडाळ येथे मंजूर असणारे क्रीडा संकुल हे कुडाळातच व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांनी आमदार शिवेंद्रराजेंना भेटून निवेदनाद्वारे केली.
या संकुलात धावण्याचा ट्रॅक (Running Track), विविध खेळांची मैदाने (Playground), बहुउद्देशीय हॉल, खेळांचे साहित्य व संकुलास संपूर्ण संरक्षण भिंत अशा प्रकारे सुसज्ज संकुल उभारण्यात येणार आहे. जागेची निश्चिती होताच लगेच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले या कमिटीचे अध्यक्ष असून तहसीलदार राजेंद्र पोळ कार्याध्यक्ष, क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांचा देखील कमिटीत सहभाग आहे.
Citizens Demand MLA Shivendraraje Bhosale To Set Up A Sports Complex In Kudal Village Satara Marathi News
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.