पाचवड - पाचगणी बसच्या फे-या वाढवा; प्रवाशांची मागणी

पाचवड - पाचगणी बसच्या फे-या वाढवा; प्रवाशांची मागणी
Updated on

पाचगणी (जि. सातारा) : मेढा आगाराची पाचवड- पाचगणी बससेवेची अवस्था असून, "अडचण नसून खोळंबा' अशी झाली असून, या गाडीला ब्रेक देण्याच्या धोरणामुळे प्रवाशांची अडचण होत आहे. वर्षानुवर्षे प्रवाशांच्या दिमतीला धावणारी व हमखास उत्पन्न देणारी मेढा आगाराची पाचवड - पाचगणी बससेवा लॉकडाउनच्या कालावधीत अन्य बससेवेप्रमाणे बंद झाली. 

महामंडळाने बससेवा पुन्हा सुरू केल्यानंतर मेढा आगाराने पाचवड- पाचगणीकडे धावणाऱ्या बससेवेच्या संख्येत कपात करताना सोयीनुसार वेळापत्रक तयार केले असून, सकाळी साडेसहा वाजता पाचवड येथून पाचगणीला सुटणारी बस आता सकाळी सव्वाआठ वाजता सोडण्यात येत असल्याने घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडले आहे.

घाबरू नका! कोरोनावरील लशीमुळे एड्‌स होत नाही; ऑक्‍सफर्डचा दावा

त्यामध्ये महिला, विद्यार्थी, वयोवृद्धांना पाचगणीपर्यंत पोचण्यासाठी कसरत करावी लागत आहे. लॉकडाउनपूर्वी पाचवड ते पाचगणी व परत पाचवड अशा सुरळीत असणाऱ्या बससेवेत अनेक गाड्या फेऱ्या मारत होत्या. मात्र, सध्या हा भार एकाच बसवर आहे. याबाबत अनेकदा आवाज उठवूनही कोणीही दखल घेत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीचे आज राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.