आम्ही बुडून मरायची वाट बघताय का?; धरणग्रस्तांचा सरकारला सवाल

Marathwadi Dam
Marathwadi Damesakal
Updated on

ढेबेवाडी (सातारा) : धरणामुळे गावातील बहुतांश कुटुंबे पुनर्वसित गावठाणात स्थलांतरित झालेली असली, तरी अद्याप मूळ गावातच मुक्काम ठोकून असलेल्या मराठवाडी धरणांतर्गत (Marathwadi Dam) घोटील येथील तीन कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न यंदाच्या पावसाळ्यातही (Heavy Rain) पुन्हा चर्चेत आला आहे. या वर्षी धरणात वाढणाऱ्या पाणीसाठ्यामुळे संबंधित कुटुंबांचे वास्तव्य असलेली राहती घरे पाण्याखाली जाणार असल्याने शासन याप्रश्नी काय भूमिका घेतेय याकडे धरणग्रस्तांचे लक्ष लागून राहिलेले आहे. (Citizens Of Ghotil Village Criticize The Government Over Marathwadi Dam Issue Satara Marathi News)

Summary

मराठवाडी प्रकल्पातील घोटीलचे सांगली जिल्ह्यातील कोतीज व सातारा जिल्ह्यातील ताईगडेवाडीनजीक पुनर्वसन करण्यात आले आहे.

मराठवाडी प्रकल्पातील (Marathwadi Project) घोटीलचे सांगली जिल्ह्यातील कोतीज व सातारा जिल्ह्यातील ताईगडेवाडीनजीक पुनर्वसन करण्यात आले आहे. गेल्या ११ वर्षांत तेथील बहुतांश कुटुंबे पुनर्वसित ठिकाणी विस्थापित झाली असली, तरी पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित राहिल्याने तीन कुटुंबांनी मूळ गावच सोडलेले नाही. संकलन यादी, भूखंड, शेतजमीन, जमिनीऐवजी रोख रकमेची भरपाई आदींशी निगडित त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. पावसाळ्यात चोहोबाजूंनी पडणारा पाण्याचा वेढा आणि त्यात बुडणारे रस्ते व फरशी पूल, आजूबाजूला मोकळ्या पडलेल्या घरांमुळे उंदीर, घुशींसह सापांचा मुक्त संचार, पाण्यात बुडणारी विहीर आणि हातपंप अशा बिकट परिस्थितीत पावसाचे पाणी पिण्यासाठी वापरत ही कुटुंबे पावसाळ्यात एक एक दिवस ढकलतात.

Marathwadi Dam
वारीबाबत शासनाची कृती दुर्योधन, दुःशासनासारखीच

गेल्या वर्षीपर्यंत धरणाचे पाणी संबंधितांच्या घरापर्यंत पोचायचे. मात्र, या वर्षी सांडव्याचे बांधकाम केल्याने पाणीसाठा १.४ टीएमसीवरून जवळपास दोन टीएमसीवर पोचणार आहे. घोटीलमध्ये वास्तव्यास असलेल्या कुटुंबांची घरे पाण्यात बुडणार असल्याने त्यांच्या अडचणीत दर वर्षीपेक्षा अधिकच वाढ होणार आहे. सध्या पावसाची उघडीप असल्याने धरणाच्या पाणीपातळीत फारशी वाढ दिसत नाही. मात्र, पावसाचा जोर वाढल्यास अचानक परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. पाटबंधारे विभागाकडून (Department of Irrigation) संबंधितांसाठी तात्पुरत्या निवारा शेडची व्यवस्था करत असल्याचे सांगण्यात येत असले, तरी आमच्या प्रलंबित प्रश्नाचे काय, ते आधी सोडवा तरच घरे सोडू अन्यथा बुडून मुरू, असे पारूबाई पवार व संतोष पवार या धरणग्रस्तांनी सांगितले. आम्ही बुडून मरायची वाट शासन बघतय की काय?असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Citizens Of Ghotil Village Criticize The Government Over Marathwadi Dam Issue Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.