मुख्यमंत्र्यांचा असाही संवेदनशीलपणा! जमिनीवर बसून वृद्ध दांपत्याची केली विचारपूस अन् दिला मदतीचा हात

आपल्या पदाचा, राजशिष्टाचाराचा बाऊ न करता मुख्यमंत्र्यांनी त्यांची जमिनीवर बसून आपुलकीने विचारपूस केली.
CM Eknath Shinde
CM Eknath Shinde esakal
Updated on
Summary

मुख्यमंत्री शिंदे हे गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या मूळगावी दरे (ता. महाबळेश्वर) येथे आले होते.

सातारा : आपल्या मूळ गावाकडून मुंबईकडे शासकीय वाहनाने परतणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा ताफा अचानक एका गावाजवळ थांबतो. तेथील निराधार वृद्ध दांपत्याबाबत त्यांना माहिती मिळते.

आपल्या पदाचा, राजशिष्टाचाराचा बाऊ न करता मुख्यमंत्र्यांनी त्यांची जमिनीवर बसून आपुलकीने विचारपूस केली, तसेच जिल्हा प्रशासनाला त्या वृद्ध दांपत्याचे तातडीने पुनर्वसन करण्याची सूचना करून ते पुढे मार्गस्थ झाले.

CM Eknath Shinde
Siddheshwar Factory : चिमणी पाडून वाटोळं करायचं होतं, त्यांनी ते केलं, पण..; सुशीलकुमार शिंदेंचा कोणावर निशाणा?

यातून मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता पुन्हा एकदा अधोरेखित झाली. मुख्यमंत्री शिंदे हे गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या मूळगावी दरे (ता. महाबळेश्वर) येथे आले होते. काल तापोळा आणि दरे दरम्यान नव्याने तयार होत असलेल्या पुलाच्या कामाची त्यांनी पाहणी केली.

या वेळी एका ग्रामस्थाने त्यांना जवळच एक निराधार वृद्ध दांपत्य राहात असल्याचे निदर्शनास आणून दिले. क्षणाचाही विलंब न लावता मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या भेटीला गेले. पिंपरीतांब येथील भागडवाडीतील ७५ वर्षांचे विठ्ठल धोंडू गोरे हे आपल्या पत्नीसह राहतात. त्यांची देखभाल करणार कुणीही नाही.

CM Eknath Shinde
Bapusaheb Rade : कुस्ती विश्वावर शोककळा! मुकी कुस्ती बोलकी करणाऱ्या ज्येष्ठ निवेदकाचं निधन

तुटपुंज्या संसारात ते दोघे उघड्यावरच राहतात. मुख्यमंत्री शिंदे त्यांच्याजवळ गेले. थेट जमिनीवर बसून त्यांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. पावसाळ्यात तुम्ही अशा अवस्थेत कसे राहणार, त्याऐवजी गावाजवळ का राहात नाही, असे त्यांना विचारले. मात्र, त्यांनी काहीही ठोस उत्तर दिले नाही.

अखेरीस मुख्यमंत्र्यांनी या दांपत्याला पावसाळ्यात लागेल तेवढे अन्नधान्य आणि मदत देण्याचे निर्देश दिले. ते ज्या ठिकाणी राहतात, तेथे पावसाळ्यात त्यांना अचानक मदत लागल्यास कुणीही मदत करू शकणार नाही. त्यामुळे गावाजवळ राहावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी त्यांना केली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना या वृद्ध दांपत्याचे त्वरित पुनर्वसन करण्याची सूचना केली.

CM Eknath Shinde
Kolhapur : मुख्यमंत्र्यांनी केलेल्या 'त्या' विधानाचा आम्हाला सार्थ अभिमान; असं का म्हणाले सतेज पाटील?

मुख्यमंत्री शिंदे नेहमीच पदाचा मोठेपणा मिरवण्यापेक्षा आपल्या पदाचा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी कसा वापर करता येईल, याचाच विचार करतात आणि ते कृतीतून दाखवतात. पिंपरीतांब येथील भागडवाडीतील विठ्ठल गोरे यांना मदत करताना त्यांच्यातली हीच संवेदनशीलता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.