Eknath Shinde: परदेशी कशाला जायाचं गड्या... CM शिंदेंचा कोणाला टोला? निवडणुकीच्या धामधुमीनंतरचा व्हिडीओ केला शेअर

Eknath Shinde: एकनाथ शिंदे ३ दिवस दरे गावात मुक्कामी आहेत. काल हेलिकॉप्टरने ते दरे येथे पोहचले. विश्रांती आणि शांततेसाठी गावात आल्याचे त्यांनी सांगितले.
 CM Eknath Shinde visit to Satara dare
CM Eknath Shinde visit to Satara dareesakal
Updated on

Eknath Shinde:

लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे मुळगाव दरे येथे मुक्कामी गेले आहेत. त्यांनी एक्स सोशल मीडियावर हँडलवर व्हिडिओ ट्वीट केला आहे. गावातील देवाच्या वार्षिक पुजेत देखील एकनाथ शिंदे हजर राहणार आहेत.

एकनाथ शिंदे ३ दिवस दरे गावात मुक्कामी आहेत. काल हेलिकॉप्टरने ते दरे येथे पोहचले. विश्रांती आणि शांततेसाठी गावात आल्याचे त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे म्हणाले,  "लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला. यावेळी शेतशिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली. जीवाला जीव देणाऱ्या गाई गुरांची चौकशी करून त्यांना प्रेमाने दोन घास खाऊ घातले. तसेच शेतात जाऊन चिकू, फणस, सुपारी आणि भाज्यांच्या लागवडीची पाहणी केली. इथली माती माझ्या मनाला शांतता देतेच पण पुन्हा एकदा नव्या जोमाने नवी आव्हाने सर करण्याचे बळही देते."

 CM Eknath Shinde visit to Satara dare
काय आहे स्वामी विवेकानंदांची ध्यानपद्धती ? PM मोदी कन्याकुमारीमधील मेडिटेशनमुळे आहे चर्चेत

उद्धव ठाकरेंना टोला -


उद्धव ठाकरे कुटुंबासोबत सध्या लंडन दौऱ्यावर आहेत. यावरुन एकनाथ शिंदे यांनी टोला देखील लगावला आहे.

परदेशी कशाला जायाचं गड्या आपला गाव बरा
शेत पिकाची दुनिया न्यारी वसे जिथे विठूरायाची पंढरी...असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

 CM Eknath Shinde visit to Satara dare
Monsoon In Kerala: आला बाबा एकदाचा... मान्सून दोन दिवस आधीच केरळमध्ये दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.