Eknath Shinde : लोकांच्या समस्या जाणून घेत CM शिंदेंनी दऱ्यातील हळदीच्या शेतात केलं दोन तास काम!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दरे येथे दोन तीन तास शेतात काम केले.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindeesakal
Updated on
Summary

मुख्यमंत्री शिंदे यांनी दरे गावी (Dare Village) भेटायला आलेल्या सर्व लोकांच्या समस्या ऐकून निवेदन स्वीकारली.

कास : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दरे येथे दोन तीन तास शेतात काम केले. त्यांनी आपल्या शेतातील हळदीला यंत्राने भर घातली. त्याचबरोबर मत्स्यशेती प्रकल्प, गोशाळा यांनाही भेट देऊन पाहणी केली.

CM Eknath Shinde
Gram Panchayat Election Results : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपची जोरदार मुसंडी; महायुतीची वाढली ताकद, 'महाविकास'ला फुटीचा फटका

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी दरे गावी (Dare Village) भेटायला आलेल्या सर्व लोकांच्या समस्या ऐकून निवेदन स्वीकारली. जनता दरबार भरवून त्यांनी आलेल्या लोकांच्या समस्याही जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासोबत त्यांनी विविध विकासकामांचा आढावा, तसेच पर्यटन वाढीसाठी आवश्यक बाबी, शेती व रोजगार निर्मिती आदींबाबत माहिती घेतली.

CM Eknath Shinde
Gram Panchayat Results : सांगलीत महाविकास आघाडीला 38, महायुतीला 33 गावांत सत्ता; खासदार पाटील, गोपीचंद पडळकरांच्या गटांची काय अवस्था?

एकनाथ खडसेंसाठी एअर ॲम्ब्युलन्स

माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समजताच मुख्यमंत्री शिंदे यांनी तत्परतेने फोनवरून यंत्रणा हलवत खडसे यांच्यासाठी एअर ॲम्ब्युलन्स उपलब्ध करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. शेतात काम करतानाच राज्यातील परिस्थितीवरही बारीक लक्ष असल्याचे त्यांनी दाखवून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.