अनेक गोष्टी आपल्या तोट्याच्या झाल्या आहेत. त्याकडे आपण गांभीर्याने पाहिले पाहिजे.
कऱ्हाड : केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी (Modi Government) गद्दारांना हाताशी घेत सत्तेतून राजकारण आणि अर्थकारण साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या सर्वांनीच राज्याची सुरू केलेली लूट थांबवा. त्यांना येत्या निवडणुकीत मतदानातून धडा शिकवा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केले.
कासारशिरंबे येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, काँग्रेसचे दक्षिण तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, युवा नेते इंद्रजित चव्हाण, नानासाहेब पाटील, शिवाजीराव मोहिते, युवा नेते जयेश मोहिते, महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा गीतांजली थोरात, दादासाहेब पाटील, कृष्णाचे माजी संचालक जयशंकर यादव, सरपंच उमेश पवार, माजी सरपंच सुदाम बोंद्रे, रयत साखर कारखान्याचे संचालक जयवंतराव बोंद्रे उपस्थित होते.
आमदार चव्हाण म्हणाले, ‘‘जीएसटीतील पैसे गोळा करून तेच पैसे जनतेला परत देऊन त्याचा गाजावाजा केला जात आहे. यावर समाधानी होऊन चालणार नाही. अनेक गोष्टी आपल्या तोट्याच्या झाल्या आहेत. त्याकडे आपण गांभीर्याने पाहिले पाहिजे. राज्याचे साक्षरतेचे प्रमाण ८३ टक्के आहे. महाराष्ट्र साक्षरतेबाबतीत केरळपर्यंत जायला वेळ लागेल.
ठेक्यांमध्ये टक्केवारी व बदलीमध्ये पैसे घेऊन चालणारी लोकं राज्याचा विकास काय करणार? अनेक जणांवर सरकारी यंत्रणांचा प्रचंड दबाव आहे. देशातील पहिल्या योजनांची नावे बदलली, कलमे बदलली आहेत. खासदार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण लोकप्रतिनिधी असल्याचे तालुक्याला अभिमानास्पद आहे. राज्यांना स्वायत्ता दिल्याची वल्गना करणारे केंद्र सरकार मणिपूरसारखे राज्य जळत असूनही त्याकडे हे सरकार लक्ष देत नाही, हे दुर्दैवी आहे.’’
यावेळी वरिष्ठ मुख्याध्यापक प्रकाश कोळेकर यांचा निवृत्तीनिमित्त व रयत कारखान्याच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल जयवंतराव बोंद्रे यांचा सत्कार झाला. सरपंच उमेश पवार, माजी सरपंच सुदाम बोंद्रे, मुख्याध्यापक जहाँगीर मुजावर यांनी स्वागत केले. दादासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. नारायण सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. विजय बोंद्रे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.