Video : व्यापाऱ्यांची 'ही' मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडणार : पृथ्वीराज चव्हाण

Video : व्यापाऱ्यांची 'ही' मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडणार : पृथ्वीराज चव्हाण
Updated on

कऱ्हाड : कोरोनाची जिल्ह्यानिहाय जशी स्थिती असेल त्याप्रमाणे जिल्हाधिकारी निर्णय घेतात. सातारा जिल्ह्यात उद्यापासून (साेमवार) सर्व मार्केट आणि दुकान उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र दिलेली वेळेचा कालवधी हा कमी आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानूसार सायंकाळ सहा वाजेपर्यंत परवानगी असायला हवी. याबाबत आपण प्रशासनाची चर्चा करून तसा निर्णय घ्यायला लावू अशी माहिती ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
सातारा जिल्हा अंशतः अनलाॅक; व्यावसायिकांना दिलासा

येथील निवडक व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींशी आमदार चव्हाण यांनी आज (रविवार) संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी शहरातील आैषध , किराणा व अऩ्य दुकानदारांचे निवडक प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर आमदार चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधून बैठकीतील माहिती दिली.

स्थानिक आमदारांना विचारले होते काय.... 

आमदार चव्हाण म्हणाले, शहरातील काही ठराविक संघटनांच्या पदाधिकारी यांच्याशी संवाद साधत चर्चा केली. कोविडशी मुकाबला करताना अर्थव्यवस्थाही सांभाळयची आहे. व्यवसाय नाही, नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे चिंताजनक वातारवण निर्माण झालेले आहे. हा आजार सुसह्य कसा होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जिल्ह्यातील कोविडची स्थिती कशी आहे, त्यावर तेथे लाॅकडाउन शिथिल केले जात आहे. अनेक जिल्ह्यात नऊ ते चार या वेळेत बाजारपेठा खुल्या केल्या आहेत. सातारा जिल्ह्यात मात्र दुपारी दोन पर्यंतची वेळ ठेवण्यात आली आहे.

तुम्ही सांगली, कोल्हापूर, कऱ्हाड प्रवास करीत असाल तर हे वाचा

तेरा नगरसेवकांसह 50 जण क्वारंटाइन; कऱ्हाड पालिका इमारत सील

व्यापारी व अनेकांच्या आलेल्या सुचनेनुसार ही वेळ अपुरी आहे. त्याबाबतची नोंद मी घेतली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे. व्यावसायिकांना सकाळी दहा ते सायंकाळी सहा अशी वेळ ठेवल्यास वेळही भरपूर मिळतो आणि नागरिकही गर्दी करणार नाहीत. त्यामुळे ती वेळ ठेवता येईल का, याची चर्चा करून व्यापारी व शासनामधील सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न केला जाईल.

Edited By : Siddharth Latkar 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.