'खोटी आश्वासनं देणाऱ्या बोलघेवड्या पुढाऱ्यांपासून सावध राहा'

Congress leader RanjitSingh Deshmukh
Congress leader RanjitSingh Deshmukhesakal
Updated on
Summary

'नूतन कार्यकर्त्यांना आत्मसन्मान देऊन संपूर्ण तालुका काँग्रेसमय करण्यासाठी प्रयत्नशील राहू.'

निमसोड (सातारा) : खोटी आश्वासने देणाऱ्या बोलघेवड्या पुढाऱ्यांपासून सावधान राहा. विकासकामांची पूर्तता करणाऱ्या काँग्रेसच्या (Congress) पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन काँग्रेसचे नेते व हरणाई सहकारी सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष रणजितसिंह देशमुख (Ranjitsingh Deshmukh) यांनी केले.

दातेवाडी (ता. खटाव) येथे जिल्हा नियोजनातून दातेवाडी ते सूर्याचीवाडी रस्त्याच्या खडीकरण-डांबरीकरणाचा प्रारंभ व राष्ट्रीय पेयजल योजनेमधून ४२ लाखांच्या पिण्याच्या पाणी योजनेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. सरपंच राज हांगे व दातेवाडीकरांना पिण्याच्या पाणी योजनेबाबत आपण दिलेला शब्द पाळला असून काँग्रेस हाच आश्वासक विकास करणारा पक्ष असल्याचे सांगून श्री. देशमुख म्हणाले, ‘‘काँग्रेस पक्षात गावोगावी मोठ्या संख्येने प्रवेश करणाऱ्या नूतन कार्यकर्त्यांना आत्मसन्मान देऊन संपूर्ण तालुका काँग्रेसमय करण्यासाठी प्रयत्नशील राहू.’’

Congress leader RanjitSingh Deshmukh
अर्ज भरण्यास 5 मिनिटं उरली असताना घडली नाट्यमय घडामोड अन्..

यावेळी परिसरातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राज हांगे यांनी सूत्रसंचालन केले. सत्यवान माळवे यांनी प्रास्ताविक, तर बाबासाहेब पवार यांनी आभार मानले. शाखा अभियंता सुभाष दादासाहेब खाडे, धोंडेवाडीचे माजी सरपंच हणमंत भोसले, सूर्याचीवाडीचे माजी उपसरपंच दिलीप जाधव, गणपत हांगे, महादेव कदम, लक्ष्मण कदम, तानाजी कदम, बशीर पटेल, सरपंच प्रतिनिधी बाबासाहेब पवार, पडळचे माजी सरपंच अजय सानप उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()