शेतकऱ्यांवरील भाजपचे पुतना मावशीचे प्रेम; काँग्रेस नेत्याची परखड टीका

गॅससहित पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात गप्प का? : शिवराज मोरे
Congress
Congressesakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : शेतकऱ्यांचा (Farmers) कळवळा दाखविणाऱ्या कऱ्हाडातील भाजप (BJP) नेत्यांनी शेतीपंपाच्या (Agricultural Pump) वीजदराविरोधात मूकमोर्चा काढला. मात्र, तेच नेते गॅस, पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीबाबत (Petrol and Diesel Price Hike) मूग गिळून गप्प आहेत. असे शेतकऱ्यांवरील पुतना मावशीचे प्रेम दाखविण्यापेक्षा त्यांनी पेट्रोल, डिझेलसह गॅस दरवाढीच्या विरोधात धमक दाखवून सामान्यांची बाजू उचलावी आणि मगच आंदोलन करावे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे (Congress Leader Shivraj More) यांनी केली.

Summary

सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम मोदी सरकार वारंवार करीत आहे.

शेतीपंपच्या वीज दरवाढीविरोधात काल (बुधवार) भाजपच्या अतुल भोसले (BJP Leader Atul Bhosale) यांनी मोर्चा काढला होता. त्या मोर्चावरून उपाध्यक्ष मोरे यांनी टीका केली आहे. श्री. मोरे म्हणाले, ‘‘देशात पेट्रोल डिझेलने १०० रुपयांची पातळी पार केली आहे. दरवाढीमुळे महागाई वाढली आहे. सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. इंधन दरवाढ दिवसेंदिवस होत आहे. त्या इंधन दरवाढीमुळे महागाई वाढत आहे. डिझेल दरवाढीमुळे शेतकऱ्यांची शेतातील कामे न परवडणारी झाली आहेत. आधीच केंद्र सरकारचे शेतीबाबत चुकीचे धोरण कारणीभूत ठरत आहे. हमीभावबाबत कोणतेही ठोस धोरण केंद्रातील मोदी सरकार ठरवत नाही. डिझेल दरवाढीमुळे शेतीची कामेही महागली आहेत. शेतकऱ्यांचा कळवळा दाखविणाऱ्या भाजप नेत्यांनी वीजदराबाबत केंद्रांचे धोरण तपासून घ्यावे व मग आंदोलन करावे, तसेच इंधनाच्या वाढत्या दराबाबतही तोंड उघडावे.’’

Congress
देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादांशी चर्चा करुन भूमिका जाहीर करणार

श्री. मोरे म्हणाले, ‘‘देशात पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर अक्षरशः गगनाला भिडले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती कमी असताना पेट्रोलचे दर देशात वाढत आहेत. केंद्र सरकारची दरवाढ नव्हे, तर करवाढ आहे. त्यामानाने बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका या देशांत पेट्रोलचे दर कमी आहेत. सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम मोदी सरकार वारंवार करीत आहे. त्यासाठी काँग्रेस वेळोवेळी रस्त्यावर उतरून जनतेचे प्रश्न मांडत आहे; परंतु याबाबत कोणतीही कणव न घेणारे भाजप नेते मूग गिळून गप्प आहेत. त्यांना एवढाच जनतेचा, शेतकऱ्यांचा कणवळा असेल तर त्यांनी इंधन दरवाढ विरोधात केंद्रातील मोदी सरकारला जाब विचारावा.’’

Congress
कर्ज फेडणाऱ्यांना सरकार 50 हजार देणार होतं, त्याचं काय झालं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.