'काँग्रेसला कोणी अपमानित करण्याचा प्रयत्न करणार असेल, तर ते सहन केलं जाणार नाही.'
दहिवडी (सातारा) : काँग्रेसच्या विचारांची बैठक असणारे कार्यकर्ते शहरासह माण तालुक्यात आहेत. त्यामुळे नगरपंचायतीच्या सतराच्या सतरा जागा काँग्रेस (Congress) लढणार असल्याचा निर्धार प्रदेश सरचिटणीस रणजितसिंह देशमुख (Ranjitsingh Deshmukh) यांनी केला. नगरपंचायत निवडणुकीच्या (Nagar Panchayat Election) पार्श्वभूमीवर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस प्रदेश काँग्रेस सचिव व निरीक्षक राजेंद्र शेलार, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. दत्तात्रय धनावडे, जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष जगन्नाथ कुंभार, महाराष्ट्र ओबीसी सेलचे चिटणीस धैर्यशील सुपले, तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, बाळासाहेब माने, विष्णुपंत अवघडे, महिला आघाडी अध्यक्षा नकुसा जाधव, युवक अध्यक्ष अॅड संदीप सजगणे, उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे आदी उपस्थित होते. रणजितसिंह देशमुख म्हणाले, ‘‘प्रतिकूल परिस्थितीला घाबरून न जाता सतत प्रयत्न केले तर यश मिळतेच. पराभवातून विजय मिळवता येतो, हे आम्ही खटावमध्ये सिध्द केले आहे. कॉंग्रेसची ताकद वाढवून कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जपला जाईल.’’
राजेंद्र शेलार म्हणाले, ‘‘स्वबळावर लढायचे की आघाडी करून हा स्थानिक कार्यकर्त्यांचा निर्णय असेल. काँग्रेसला सन्मानपूर्वक सामावून घेऊन आघाडी केली तर आमची हरकत नाही. पण, कोणी अपमानित करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते सहन केले जाणार नाही.’’ बाबासाहेब माने, विष्णुपंत अवघडे, नकुसा जाधव, बाळासाहेब माने यांनी निवडणुकीविषयी मते व्यक्त केली.
सन्मान करणारांबरोबरच आघाडी करू
रक्तात काँग्रेस आहे असे सांगणाऱ्यांनी, मतदारसंघात तब्बल ३२ वेळा मुख्यमंत्र्यांना आणणाऱ्यांनी शेवटी गद्दारी करत काँग्रेस पक्ष सोडला, असा टोला आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांना हाणतानाच मित्रपक्षही आपला फक्त वापर करतो. त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीत मित्रपक्ष असो वा अनिल देसाई, डॉ. संदीप पोळ, वंचित बहुजन आघाडी असो, जे आपल्यासोबत येतील अन् जिथे सन्मान होईल, त्यांच्यासोबत आघाडी करण्यात येईल, असे संकेत रणजितसिंह यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.