ढेबेवाडी (सातारा) : मोबाईल कंपनीची (Mobile company) केबल पुरण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करत संबंधितांनी मानेगाव ते मालदन फाटा दरम्यानच्या डांबरी रस्त्याला हानी पोचवून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याने दोषींवर गुन्हा दाखल करावा, अशी विनंती सार्वजनिक बांधकाम विभागाने (Public Construction Department) येथील पोलीस ठाण्यास (Dhebewadi Police Station) पत्राव्दारे केली आहे.
या प्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीतून या रस्त्याचे खोदकाम करताना दिलेल्या सूचनांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले होते. याबाबत सार्वजनिक बांधकाम पाटण उपविभागाने येथील पोलीस ठाण्यास दिलेल्या पत्रात सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीबरोबरच अपघाताची शक्यता निर्माण केल्याने संबंधितांवर गुन्हा नोंद करून कामावरील मशिनरी जप्त करावी, असे नमूद केलेले आहे.
३० जूनला प्रत्यक्ष पहाणी केली असता, संबंधितांनी डांबरी पृष्ठभागाकडेलाच रस्त्याच्या मध्यापासून आठ मीटरवर खुदाई केल्याचे दिसून आले होते. त्यावेळी चर पूर्ववत करून काम बंद करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. मात्र, उपाययोजना न करता त्यांनी खुदाई सुरूच ठेवल्याचे निदर्शनास आले. खुदाईमुळे रस्त्याची साईडपट्टी पूर्णतः खराब झाल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, असेही पत्रात म्हटले आहे. दरम्यान, अशा पत्राच्या आधारे गुन्हा दाखल करता येत नसल्याने जबाबदार अधिकाऱ्यांना इकडे पाठवून द्यावे, असे पोलिसांकडून बांधकाम विभागाला उलट पत्राने कळविण्यात आल्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार यांनी सांगितले.
मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
या प्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून, दोषींवर कठोर कारवाई करून रस्ता पूर्ववत करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाटण तालुकाध्यक्ष गोरख नारकर, उपाध्यक्ष अंकुश कापसे, ढेबेवाडी विभाग अध्यक्ष दीपक मुळगावकर यांनी निवेदनाव्दारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.