ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांवर 'गढूळ पाणी' पिण्याची वेळ

Water Purification Project
Water Purification Projectesakal
Updated on

मल्हारपेठ (सातारा) : भारत निर्माणमधून येथे झालेल्या जलशुद्धीकरण पाणी योजनेच्या (Water Purification Project) खर्चाने कोटीची उड्डाणे घेतली. मात्र, गावाला आजअखेर काही केल्या शुद्ध पाणी मिळालेले नाही. पाणी योजनेवर राजकारण (Politics) मात्र गतीत आले हेच करे. राजकीय वादामुळे योजनेलाच घरघर लागली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात (Heavy Rain) ग्रामस्थांवर गढूळ पाणी (Muddy Water) पिण्याची वेळ आली आहे. एका तपाहून अधिक काळ योजनेतून पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया ठप्प आहे. दोन्ही राजकीय सत्ताधाऱ्यांच्या विस्कळित कारभाराचा नागरिकांना त्रास होतो आहे. मल्हारपेठवासीयांना शुद्ध पाणी कधी मिळणार, असा नागरिकांचा सवाल आहे. (Contaminated Water Supply From Gram Panchayat To The Citizens Of Malharpeth Satara Marathi News)

Summary

राजकीय वादामुळे योजनेलाच घरघर लागली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांवर गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे.

गावास ७५ लाखांची शुद्ध पाणीयोजना मंजूर झाली. मात्र, गावांतर्गत वादामुळे ती रखडली आहे. नवीन समिती नेमली, त्यांनी परदेशी शुद्धीकरणाची प्रक्रिया बसवली. सहा महिने कसेबसे त्यावर काम चालले. मात्र, पुन्हा ती योजना रखडली. पावसाळ्यात गाळ साचल्याने मुख्य पाइपलाइनवर दाब आला. ती पाइप फुटल्याने योजना ठप्प आहे. पर्यायाने शुद्ध पाणीयोजना असूनही गावाला गढूळच पाणी पिण्याची वेळ आली आहे. येथे आरोग्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. विरोधी देसाई गटाने ग्रामपंचायतीची (Malharpeth Gram Panchayat) सत्ता ताब्यात घेतली. सत्तेनंतर योजनेची पाइपलाइन काढली. सहा वर्षांपूर्वी योजनेवर खर्च करून देसाई गटाने मुख्य पाण्याची टाकी ते बाजारपेठेपर्यंत दहा इंची पाइप बसवली. त्यासाठी आठ ते दहा लाख रुपये खर्च केला.

Water Purification Project
काँग्रेसमध्ये कुरघोड्यांचे राजकारण; अध्यक्षपदावरून कलगीतुरा

मात्र, तरीही गावाला शुद्ध पाणी काही केल्या अद्यापही मिळाले नाही. नदीवरून आणलेले पाणी थेट नळ पाणीपुरवठ्यातून गावाला दिले जात आहे. एक कोटी योजनेला खर्च झालेला आहे. तरीही शुध्द पाण्याचा पत्ताच नाही. सरपंच असताना त्याची मंजुरी मिळाली होती. मात्र, तत्कालीन सत्ताधारी आणी आत्ताच्या पदाधिकाऱ्यांनी ही योजना चालावी म्हणून प्रयत्न केले नाहीत. राज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांना भेटून लक्ष घालण्याची विनंती करणार आहे. गावास शुद्ध पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे माजी सरपंच सुनील पानस्कर (Former Sarpanch Sunil Panskar) यांनी सांगितले.

Water Purification Project
'कृष्णा'त 32 वर्षांपासून सत्ता संघर्ष; मोहिते-भोसले मनोमिलनाचा 2010 मध्ये पराभव

राजकीय गटांकडून केवळ आश्वासने

मल्हारपेठची अडीच वर्षांपूर्वी निवडणूक झाली. त्यात सर्वच राजकीय गटांनी आश्वासने दिली. मात्र, एकानेही ती पूर्ण न केल्याने गावास आजअखेर शुद्ध पाणी मिळालेले नाही. मुख्य बाजारपेठेच्या गावालाच शुद्ध पाणी नसल्याने त्याची चर्चा दूरवर होते आहे. मल्हारपेठच्या आजूबाजूच्या वाडीवस्तीवर शुध्द पाणी पोचले. मात्र, मल्हारपेठवासीय अद्यापही वंचित आहेत.

Contaminated Water Supply From Gram Panchayat To The Citizens Of Malharpeth Satara Marathi News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()