Karad : 'आपला नातू तुपाशी, दुसऱ्याची पोरं उपाशी'; 'कंत्राटी नोकर भरती'वरुन BJP चं मविआ'विरोधात तीव्र आंदोलन

महाविकास आघाडीचा बुरखा फाडण्याचे काम उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.
Contract Employees Recruitment Case BJP
Contract Employees Recruitment Case BJPesakal
Updated on
Summary

महाविकास आघाडी सरकारने कंत्राटीकरणाचा केलेला जीआर आमच्या सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा बुरखा फाटला आहे.

कऱ्हाड : कंत्राटी नोकर भरतीचा (Contract Employees Recruitment) अध्यादेश काढणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो, आपला नातू तुपाशी दुसऱ्याची पोरं उपाशी, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा अधिकार असो, अशा घोषणा देत आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने कंत्राटी पद भरतीच्या महाविकास आघाडी सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा निषेध व्यक्त केला.

Contract Employees Recruitment Case BJP
Maratha Reservation : 'जो कोणी मराठा आरक्षणाला विरोध करेल, त्‍याला आता सुटी नाही'; जरांगे-पाटलांचा स्पष्ट इशारा

भारतीय जनता पक्षाच्या वतीने (BJP) कऱ्हाड येथील दत्त चौकात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने काढलेल्या कंत्राटी नोकर भरतीचा निषेध करण्यात आला. भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी नोकर भरतीचा अध्यादेश रद्द करून महाविकास आघाडीचा पर्दाफाश केला आहे.

महाविकास आघाडीचा बुरखा फाडण्याचे काम उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्रातल्या तरुणांचे रक्त शोषण करण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कंत्राटी भरतीचा निर्णय घेतला. त्याचा आम्ही निषेध करत आहोत. उद्धव ठाकरे व शरद पवार यांचा निषेध करत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा अध्यादेश रद्द केला आहे.'

Contract Employees Recruitment Case BJP
Suresh Khade : मटका बंद न केल्यास पोलिस निरीक्षकांवरच कारवाई करणार; पालकमंत्र्यांचा सज्जड दम

भाजपचे उपाध्यक्ष विक्रम पावसकर म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने कंत्राटीकरणाचा केलेला जीआर आमच्या सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा बुरखा फाटला आहे. येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनता मत देणार नाही हे लक्षात आल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्याकडून काही आरोप केले जात आहेत. त्याला तोंड देण्यासाठी भारतीय जनता पक्ष खंबीर आहे.

Contract Employees Recruitment Case BJP
Loksabha Election : राज्‍यात 48 पैकी महायुतीचे 45 खासदार निवडून येतील; BJP प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना विश्वास

यावेळी भाजपचे कराड शहर अध्यक्ष एकनाथ बागडी, मुकुंद चरेगावकर, रामकृष्ण वेताळ धनाजी पाटील, महिला आघाडीच्या कविता कचरे, स्वाती पिसाळ सीमा घाडगे, सारिका गावडे, दिपाली खोत, सुदर्शन पाटसकर सूर्यकांत पडवळ रवींद्र लाहोटी भरत देसाई सुहास जगताप शंकर पाटील प्रमोद शिंदे दिलीप जाधव, भरत देसाई यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.