Jaykumar Gore
Jaykumar Goreesakal

ED Raid : भाजप आमदाराविरोधात भ्रष्टाचाराची याचिका दाखल करणाऱ्या देशमुखांच्या घरावर ED चा छापा; आज मायणी बंदची हाक

Deepak Deshmukh : अधिकाऱ्यांकडून रात्री उशिरापर्यंत देशमुख कुटुंबीयांची कसून चौकशी सुरू होती.
Published on
Summary

दीपक देशमुख यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर कोविड घोटाळ्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

कलेढोण : भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्याविरोधात कोरोना काळातील भ्रष्टाचाराची मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल करणारे व मायणी मेडिकल कॉलेजचे माजी उपाध्यक्ष दीपक देशमुख (Deepak Deshmukh), बंधू हिम्मत देशमुख, चुलते चंद्रकांत देशमुख यांच्या निवासस्थानावर सकाळी सात वाजता अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी छापा टाकला.

अधिकाऱ्यांकडून रात्री उशिरापर्यंत देशमुख कुटुंबीयांची कसून चौकशी सुरू होती. गोरे विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील पुढील सुनावणी १२ ऑगस्टला असून, सुनावणीपूर्वी होणाऱ्या या कारवाईबद्दल जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, या कारवाईविरोधात मायणीकरांनी आज मायणी बंदची हाक दिली आहे.

Jaykumar Gore
Shashikant Shinde : कोरेगाव मतदारसंघातूनच विधानसभा निवडणूक लढणार; आमदार शशिकांत शिंदेंची मोठी घोषणा

मायणी मेडिकल कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. देशमुख यांना दोन वर्षांपूर्वी, तर त्यांचे थोरले बंधू आप्पासाहेब देशमुख यांना सुमारे दीड वर्षांपूर्वी ईडीने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आज मायणी मेडिकल कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. देशमुख यांचे बंधू चंद्रकांत देशमुख यांच्या चांदणी चौकातील, तर पुतणे दीपक देशमुख व हिम्मत देशमुख यांच्या मायणी-शिंदेवाडी रस्त्यावरील निवासस्थानावर ईडीच्या अधिकाऱ्यांना छापा टाकला.

Jaykumar Gore
'भाजपमध्ये गेलेल्या गद्दारांना गाडण्यासाठी कामाला लागा'; काँग्रेस नेत्याची जयकुमार गोरेंवर सडकून टीका

त्यानंतर देशमुख कुटुंबीयांची कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. दीपक देशमुख यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर कोविड घोटाळ्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात गोरेंवर मृत लोकांच्या नावावर कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित करून भाजप व आमदार गोरेंवर टीका केली होती.

असा आहे ताफा..!

चंद्रकांत देशमुख, हिम्मत देशमुख व दीपक देशमुख यांच्या घरासमोर सुमारे पाच चारचाकी मोटारी, ईडीचे अधिकारी, सशस्त्र जवान, महिला पोलिस असा ताफ्याने घेराव घातला आहे. सकाळी सातपासून रात्री उशिरापर्यंत हे अधिकारी प्रत्येकाची चौकशी करीत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.