कोविडमुक्त गावांत शाळा होणार सुरू; ग्रामस्तरावर समिती स्थापन!

विद्यार्थ्यांची तपासणी करून शाळेत प्रवेश
School
Schoolesakal
Updated on

सातारा : कोविडमुक्त (Coronavirus) परिसरात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग १६ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. यासाठी ग्रामस्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून, शाळा (School) सुरू करण्यासाठी संबंधित गावांत मागील महिनाभरात एकही कोविड रुग्ण आढळला नसल्याची अटही घालण्यात आली आहे.

Summary

कोविडमुक्त (Coronavirus) परिसरात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग १६ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत.

कोरोनाच्या काळात मागील दीड वर्षाहून अधिक काळ शाळा, महाविद्यालये बंद आहेत. मात्र, गेल्या महिनाभरापासून राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लॉकडाउन शिथिल करण्यात आले. त्यानंतर शाळाही सुरू करण्याची मागणी जोर धरू लागल्याने अखेर शिक्षण विभागाने काही अटींची बंधने घालून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यासाठी ग्रामस्तरावर नियोजन करण्यात आले असून, शिक्षकांच्याही कोविड चाचण्या बंधनकारक करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात सरपंचांच्या अध्यक्षतेखाली तलाठी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांची समिती नेमण्यात येणार आहे. याचबरोबर केवळ कोविडमुक्त परिसरातच शाळा सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.

School
घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत; माजी मुख्यमंत्र्यांनी दिला विश्वास

शाळा सुरू करताना सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश देताना थर्मलगन, ऑक्‍सिमीटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची तपासणी करूनच शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. याचबरोबर शाळेत कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास तत्काळ शाळा बंद करून पुढील उपाययोजना कराव्यात, शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना टप्‍प्याटप्‍प्याने बोलवावे, तसेच शाळेने ठराविक विषयांना प्राधान्य देत शिकवावे. तसेच एका बाकड्यावर एकच विद्यार्थी बसवावा, अशा प्रकारचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.

School
शपथविधीसाठी गर्दी जमविल्याप्रकरणी जैन ग्रुपच्या अध्यक्षांविरुध्द गुन्हा

विलगीकरण कक्ष बदलणार

जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये कोरोनाच्या बाधित व संशयित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. मात्र, शाळा सुरू करण्याचे आदेश आल्याने संबंधित शाळेतील विलगीकरण केंद्र इतर ठिकाणी हस्तांतरित करण्याचे आदेश ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. संपूर्ण शाळांचे निर्जंतुकीकरण करणाच्याही सूचना करण्यात आल्या आहेत.

School
कोयनेवर अस्मानी संकट! नेताजी सुभाषचंद्र हायस्कूलमागे 30 फूट भगदाड

कोविडमुक्त भागातील शाळा सुरू होणार आहेत. यासाठी संबंधित गावात समिती नेमण्याचे आदेश देण्यात आले असून, शाळा सुरू करताना संपूर्णपणे काळजी घेतली जाणार आहे.

-प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.