Satara Unlock : साताऱ्यात 15 ऑगस्टपासून Corona निर्बंध शिथिल

जिल्हाधिकाऱ्यांकडून अनलॉक जाहीर; लॉकडाउनच्या फेऱ्यात अडकलेल्या सातारकरांची सुटका
Satara Unlock
Satara Unlockesakal
Updated on

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) कमी होऊ लागल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांनी अनलॉकचा (Satara Unlock) नवा आदेश लागू केला. त्यामध्ये सर्व दुकाने, हॉटेल, जिम, योग सेंटर, स्पा, शॉपिंग मॉल हे सर्व रविवारपासून (ता. १५) रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. ऑगस्ट महिन्यात ग्रामसभा (Gram Sabha) घेणे बंधनकारक असल्याने आता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत ग्रामसभा घेण्यासही जिल्हाधिकाऱ्यांनी मुभा दिली आहे. गेली १५ महिने लॉकडाउनच्या (Corona Lockdown) फेऱ्यात अडकलेल्या सातारकरांची सुटका झाली आहे. अनलॉक होत असताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन, तसेच मास्क वापरणे बंधनकारक आहे.

Summary

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अनलॉकचा नवा आदेश लागू केला.

मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचा संसर्ग कमी झालेल्या जिल्ह्यात रात्री दहापर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे; पण जिल्ह्यात अनलॉककडे लक्ष लागले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी आज जिल्ह्यात अनलॉक जाहीर करून सर्वांना सुखद धक्का दिला. रविवारपासून (ता. १५) ही नवीन नियमावली लागू होईल. ऑगस्ट महिन्यात ग्रामसभांचे आयोजन न केल्यास संबंधित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकावर कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची प्रकरणे उद्‌भवू नयेत म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामसभा घेण्यास परवानगी दिली आहे. शक्यतो ग्रामसभा या १५ ऑगस्ट रोजीच घेतल्या जातात. त्यासाठी कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करावे लागेल. हस्तांदोलन व धूम्रपान करण्यास मनाई आहे. दोन व्यक्तींमध्ये एक मीटरचे अंतर ठेवावे लागेल. सभेपूर्वी व नंतर सॅनिटायझ करणे बंधनकारक असेल. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी ग्रामसभा घेता येणार नाहीत. सूक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्रात ग्रामसभा घेण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. आंतरराज्य प्रवासासाठी लसीकरण पूर्ण केलेल्यांना बाहेरच्या राज्यातून परवानगी असेल. त्यांना आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. मात्र, अन्य प्रवाशांसाठी ७२ तासांपूर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह किंवा १४ दिवस विलगीकरण आवश्यक असेल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

Satara Unlock
शिखर बॅंक घोटाळ्यात थोरल्यासह धाकट्या पवारांचा हात

उपाहारगृहे ५० टक्के क्षमतेच्या अटीवर खुली करता येतील. हॉटेल व बारमध्ये प्रवेश करताना मास्क वापरणे अनिवार्य आहे. तेथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. दोन्ही डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले कर्मचारी व व्यवस्थापकांना परवानगी असेल. बारमध्ये पार्सल सुविधा २४ तास सुरू ठेवता येईल. सर्व दुकाने, शॉपिंग मॉल्स, जिम्नॅशिअम, योग सेंटर, सलून, स्पा तसेच इनडोअर स्पोर्टस्‌ना रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्यास मुभा आहे. शासकीय व निमशासकीय कार्यालये नियमित सुरू राहतील. खासगी कार्यालये २४ तास सुरू ठेवता येतील. एका सत्रात एकूण कर्मचारी संख्येच्या २५ टक्केच उपस्थिती ठेवता येईल. जिल्ह्यातील सर्व मैदाने, उद्याने, स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार नियमित वेळेत सुरू राहतील. विवाह सोहळ्यांसाठी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक असून, खुल्या प्रांगणात, लॉनवरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास मुभा आहे. मात्र, बंदिस्त मंगल कार्यालयात, हॉटेलमध्ये क्षमतेच्या ५० टक्के किंवा जास्तीतजास्त २०० व्यक्तींची मर्यादा असेल. दशक्रिया विधी, अंत्यविधीसाठी जास्तीतजास्त ५० नागरिकांच्या उपस्थितीची परवानगी आहे.

Satara Unlock
ठरलं! जिल्हा बॅंकेची रणधुमाळी ऑक्टोबरमध्ये

हे बंद राहणार..

  • सिनेमागृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स

  • सर्व धार्मिक स्थळे

  • वाढदिवस, राजकीय, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम

  • निवडणूक प्रचार सभा, रॅली, मोर्चे, क्रीडा स्पर्धा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()