उंब्रज (सातारा) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील (Umbraj Primary Health Center) अधिकाऱ्यांनी कोरोना लसीकरणापूर्वी (Corona vaccination) कोरोना टेस्ट (Corona test) बंधनकारक केली. त्यामुळे लसीकरण केंद्रावर वादावादी झाली. नागरिकांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना चांगलेच फैलावर घेतले. लसीकरणादरम्यान होणाऱ्या गोंधळामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दररोजच्या नवनवीन नियमाला नागरिक कंटाळले आहेत. लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी चिंता वाढवणारी आहे. (Corona Test Mandatory For Citizens At Umbraj Primary Health Center Satara Marathi News)
लसीकरणादरम्यान होणाऱ्या गोंधळामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दररोजच्या नवनवीन नियमाला नागरिक कंटाळले आहेत.
लसीकरण केंद्रावर पुरेशी लस उपलब्ध होत नाही. त्यातच योग्य नियोजन होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. सध्या १८ वर्षांवरील सर्वांसाठी मोफत लस उपलब्ध होऊ लागली आहे. त्यामुळे गर्दी होऊ लागली आहे. उंब्रज लसीकरण केंद्रावर पहाटेपासून लसीकरणाचे टोकण घेण्यासाठी रांगा लागत आहेत. काल पहाटेपासून पहिल्या व दुसऱ्या डोससाठी लसीकरणासाठी रांगेत उभे राहिलेल्या नागरिकांना सकाळी दहा वाजता अचानक कोरोना चाचणी बंधनकारक असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.
काही नागरिकांची कोरोना टेस्ट केल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राने टेस्टिंग बंद केले. यामुळे पहाटेपासून रांगेत उभे राहिलेल्या नागरिकांना परत रांगेत उभे राहण्यासाठी धावत जावे लागले. यामध्ये अनेक वयस्कर नागरिकांना पुन्हा रांगेत नंबर मिळालाच नाही. मात्र, धावपळीत त्रास सहन करावा लागला. नागरिकांनी प्राथमिक आरोग्य विभागाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला.
लसीकरण केंद्रावर लस घेण्यास येणाऱ्या नागरिकांची कोरोना टेस्ट करणे बंधनकारक असल्याचे तोंडी आदेश जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांनी दिल्याचे मीटिंगमध्ये सांगण्यात आले आहे. मात्र, तसा लेखी आदेश नाही.
-डॉ. संजय कुंभार, वैद्यकीय अधिकारी, उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्र
Corona Test Mandatory For Citizens At Umbraj Primary Health Center Satara Marathi News
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.