साताऱ्यात गंभीर स्थिती! जिल्ह्यात 24 तासात 2364 बाधित, तर 33 जणांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात लॉकडाउन सुरू केल्यापासून निर्माण झालेली स्थिती गतवर्षीपेक्षा भयंकर आहे. त्यामुळे नियम पाळून संसर्ग साखळ्या तोडण्याचे आव्हान जिल्ह्यासमोर आहे.
Coronavirus
Coronavirusesakal
Updated on

सातारा : जिल्ह्यात लॉकडाउन (Lockdown) सुरू केल्यापासून निर्माण झालेली स्थिती गतवर्षीपेक्षा भयंकर आहे. त्यामुळेच गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाउन सुरू असताना आता तो आणखीन सहा दिवस वाढला असून यामध्ये नियम पाळून संसर्ग (Coronavirus) साखळ्या तोडण्याचे आव्हान जिल्ह्यासमोर आहे. पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक या मोठ्या जिल्ह्यामध्ये बाधित वाढीचा वेग दिलासादायक मंदावला आहे. मात्र, जिल्ह्यात गत दोन दिवसात अठराशेच्या पटीत वाढ होत होती. मात्र, पुन्हा ती दोन हजाराच्या पटीत होत आहे. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 2364 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 33 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. (Corona Test Positive Of 2364 Citizens In Satara District Today)

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या, तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 66 (7045), कराड 302 (21082), खंडाळा 228 (9721), खटाव 359 (14373), कोरेगांव 133 (13302), माण 192 (10484), महाबळेश्वर 11 (3900), पाटण 54 (6243), फलटण 562 (21679), सातारा 316 (33549), वाई 116 (11151 ) व इतर 25 (977) असे आजअखेर एकूण 153506 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 4 (162), कराड 6 (608), खंडाळा 2 (126), खटाव 7 (388), कोरेगांव 1(300), माण 2(197), महाबळेश्वर 0 (42), पाटण 1 (151), फलटण 0 (242), सातारा 8 (979), वाई 2 (294) व इतर 0, असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3489 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

साताऱ्यात कडक Lockdown! कोणावर उपासमारीची वेळ, तर कोणाला मासे पकडण्याचा छंद; पाहा Photos

Corona Test Positive Of 2364 Citizens In Satara District Today

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.