भीक मागून पोटाची खळगी भरणाऱ्या भिकाऱ्यांना लस कधी?

Corona Vaccination
Corona Vaccinationesakal
Updated on

कुकुडवाड (सातारा) : जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (corona patient) वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य विभाग (Department of Health) सतर्क होऊन लसीकरणाचा (Corona Vaccination) वेग वाढवू लागला आहे. परंतु, गावोगावी भटकंती करून जगणारे बेघर, रस्त्यावर भीक मागून पोटाची खळगी भरणाऱ्या भिकाऱ्यांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचं काय?, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे शासनासह जिल्हा प्रशासनाचे या गोष्टीकडे लक्ष असणे गरजेचे आहे. (Corona Vaccination Government Neglect Of Poor Citizens Satara Marathi News)

Summary

विविध केंद्रांच्या माध्यमातून लसीकरणाचा वेग वाढत असताना बेघर, भिकारी, तृतीयपंथी आणि भटक्या जमातींच्या लसीकरणाचा प्रश्न कायम आहे.

मागील दीड वर्षांपासून कोरोनाने संपूर्ण जगभर थैमान घातले आहे. अशा परिस्थितीमध्ये केंद्र शासनासह (Central Government) राज्य शासनाने कोरोनाचा (State government) संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन जारी केले. या स्थितीमध्ये अनेक निराधार भिकारी यांना एक वेळच जेवण देऊन अनेक सामाजिक संस्थांनी आधार दिला, तर दुसरीकडे शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला, त्यानुसार जिल्ह्यात लसीकरणाचा ही वेग वाढलेला दिसून येत आहे.

Corona Vaccination
राज्यात गृहराज्यमंत्री आहेत, हेच कुणाला माहिती नाही

विविध केंद्रांच्या माध्यमातून लसीकरणाचा वेग वाढत असताना बेघर, भिकारी, तृतीयपंथी आणि भटक्या जमातींच्या लसीकरणाचा प्रश्न कायम आहे. विशेष म्हणजे, शासनासह प्रशासनाने या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. शहरासह ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या भटक्या जमाती, बेघर, रस्त्यावर भीक मागून जगणाऱ्या भिकाऱ्यांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण कसे केले जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यातच शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली होताना दिसत नाहीत. आजही अनेक कुटुंबं मेंढपाळ व्यवसायानिमित्त स्थलांतरीत झाली आहेत, त्यांच्याही लसीकरणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Corona Vaccination
शिक्षण विस्ताराधिकारी पदोन्नतीसाठी राज्य संघटनेचे शिक्षणमंत्र्यांना साकडे

आज गावोगावी मतदान, आधार कार्ड नसलेल्या लोकांचा सर्व्हे करण्याचे आदेश आहेत. भविष्यात अशा लोकांना जिल्हा, प्रांत, तहसील स्तरावर ओळखपत्र तयार करून भविष्यात अशा लोकांचं लसीकरण त्याच ठिकाणी करण्यात येणार आहे.

-डॉ. लक्ष्मण कोडलकर, तालुका वैद्यकीय अधिकारी, माण

Corona Vaccination Government Neglect Of Poor Citizens Satara Marathi News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()