कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी जेवणाशी केली मैत्री : दत्तात्रय बारसवडे

कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी जेवणाशी केली मैत्री : दत्तात्रय बारसवडे
Updated on

दहिवडी (जि. सातारा) : कोरोनाचे निदान झाल्यावर माझे अवसान गळाले, पायाखालची वाळू सरकली. पण, काही वेळात स्वतःला सावरले. कोठेतरी ऐकल्याप्रमाणे प्रतिकारशक्ती चांगली असेल तर तुम्ही कोरोनावर सहज मात करू शकता. मग मनाने ठरवले कोरोनाविरुध्दची ही लढाई जिंकायची असेल तर जेवणाशी मैत्री करावी लागेल. पहिले तीन ते चार दिवस तर पाण्याच्या घोटाबरोबर जेवण बळजबरी आत ढकलत होतो. पुन्हा त्यात वाढ करत गेलाे आणि प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे आणि आहाराच्या जोरावर अखेर कोरोनावर मात केली असे भांडवली (ता. माण)  येथील दत्तात्रय बारसवडे यांनी नमूद केले.
कोयना धरणाचे जगभरातील शास्त्रज्ञांना आव्हान! 

ते म्हणाले, माझे वय जरी 35 वर्षे असले तरी गेली पाच वर्षे मला मणक्‍याच्या विकाराने ग्रासलेले. ऑगस्टमध्ये कोरोनाने गावात प्रवेश केला. एका झटक्‍यात दहाच्यावर कोरोनाबाधित सापडले अन्‌ दुर्दैवाने दोघांचा मृत्यू झाल्याने गावकरी हादरले. 26 ऑगस्टला मला ताप, थंडी, कणकणी, पायाचे गोळे दुखण्यास सुरुवात झाली. मी घरातच एका खोलीत विलगीकरण करून घेतले. नंतर तीन दिवस आजार अंगावरच काढला. 29 ऑगस्टला माझ्या मित्रांनी मला मलवडीत दवाखान्यात नेले. औषधे घेतली तरीही थोडाफार त्रास जाणवतच होता. त्यामुळे उपसरपंच सुनील सूर्यवंशी यांनी मला कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले. चाचणी करण्यासाठी पाच सप्टेंबर रोजी दहिवडी कोरोना केअर सेंटरमध्ये गेलो. दुर्दैवाने मला कोरोना झाल्याचे निदान झाले.

कळवणला दुकानाचा पत्रा कापून कांदा बियाण्याची चोरी 

त्यानंतर आम्हाला कोरोना केअर सेंटरमध्ये ठेवले. एकावेळी आमच्या गावातील आम्ही दहा लोक या सेंटरमध्ये होतो. आम्ही एकमेकांना आधार देत होतो. काही लोकांनी भीती घातली तर काहींनी मोठा आधार दिला. पहिले तीन दिवस थकवा, कणकणी, हात-पाय दुखणे सुरू होते. एवढ्या मोठ्या रूममध्ये एकट्याने कसे राहायचे, याची भीती वाटत होती. त्यातच पहिल्याच रात्री लाइट गेली. पण, भिऊन जाणार तो भांडवलीकर कसला.

त्याच रात्री निश्‍चय केला बर होऊनच जायचे. मनाने मनाला आधार द्यायचा. मग दुसऱ्या दिवसापासून नातेवाईक, गावातील लोकांचे फोन येण्यास सुरवात झाली, मोठा आधार वाटू लागला. मग अंगातील सगळी मरगळ झटकून टाकली. आपण कोरोना झालाय म्हणून घाबरलो तर इथेच संपून जाऊ, एवढेच लक्षात ठेवले. मनाने ठरवले ही लढाई जिंकायची असेल तर जेवणाशी मैत्री करावी लागेल. पहिले तीन ते चार दिवस तर पाण्याच्या घोटाबरोबर जेवण बळजबरी आत ढकलत होतो. पुन्हा आहार वाढवला आणि अखेर आहार आणि औषधाने कोरोनावर मात केली.

संपादन - सिद्धार्थ लाटकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.