साताऱ्यात 80 टक्के लसीकरण पूर्ण; 16 लाख नागरिकांनी घेतला डोस

Coronavirus
Coronavirusesakal
Updated on

सातारा : गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात वेगाने लसीकरण मोहीम (Vaccination Campaign) सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८० टक्के लसीकरण पूर्ण झाले असून, सर्वाधिक लसीकरण महाबळेश्‍वर, तर सर्वांत कमी लसीकरण माण तालुक्यात झाले आहे. दरम्यान, जिल्ह्याची १८ वर्षांपुढील २१ लाख लोकसंख्या असून, आतापर्यंत १६ लाख ४२ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये, पहिला डोस ११ लाख ४७ हजार, तर पाच लाख पाच हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

Summary

गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात वेगाने लसीकरण मोहीम सुरू आहे.

जिल्ह्यात एक जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली. सुरवातीच्या टप्‍प्यात जिल्ह्याला लशींचे डोस जादा आल्याने लसीकरण मोहीम वेगाने सुरू होती. मात्र, एप्रिल ते जून महिन्यापर्यंत लसीकरण मोहीम लशींअभावी मंदावल्याचे दिसून आले. मात्र, जुलै महिन्यानंतर जिल्ह्यात लसीकरणाची संख्या वाढल्याचे दिसून आले. लशींची संख्या जादा उपलब्ध झाल्याने एकाच दिवसात तब्बल ६० हजार लसीकरणाचीही नोंद गेल्या आठवड्यात झाली आहे. याचबरोबर लसीकरण सत्रांचीही संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे, लसीकरणाच्या आकडेवारीत पश्‍चिम महाराष्ट्रात तिसरा क्रमांक असून, राज्यभरात महापालिका क्षेत्र वगळता जिल्ह्याचा विचार करता सातारा जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागत आहे. त्यामुळे, जिल्हा प्रशासनाने लशींच्या बाबतीत पाठपुरावा केल्याने लशींचे डोसही जादा मिळत असल्याचे दिसून येत आहे.

Coronavirus
महिलांच्या आरोग्याची काळजी! आता पोस्टातही मिळणार 'सॅनिटरी नॅपकिन'

राज्यभरातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात वेगाने लसीकरण सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १६ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण सुरू असून, पुढील काळातही लशींचे जास्तीत-जास्त डोस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. याचबरोबर, लसीकरण सत्रांचीही संख्या वाढविण्यात आली आहे.’’

-डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, सातारा

Coronavirus
निवडणुकीत उदयनराजे 'NCP'कडे तीन जागा मागणार

लसीकरण आवाक्यात

जिल्ह्याची एकूण लोकसंख्या २० लाख ८० हजार ३३७ आहे. यामध्ये पहिला डोस ११ लाख ४७ हजार नागरिकांनी घेतला असून, पाच लाख पाच हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्याचे एकूण लसीकरण १६ लाख ४२ हजार झाल्याने पहिल्या डोसपासून केवळ चार लाख ३८ हजार नागरिक दूर आहेत.

Coronavirus
कोरोनाविरुध्दच्या लढ्यासाठी आईचं दूध बाळासाठी ठरतंय 'सुरक्षा कवच'

तालुकानिहाय लसीकरण...

एकूण लोकसंख्या - पहिला डोस - दुसरा डोस

  • जावळी - ७५,३०१ - ४३,३६८ - २५,२०५

  • कऱ्हाड - ४,०८,४३३ - २,१६,०६१ - ८८,६९६

  • खंडाळा - ९५,५१७ - ६१,२५६ - २३,५७७

  • खटाव - १,९०,५१० - ९३,७४६ - ४५,८७०

  • कोरेगाव - १,७८,१७२ - ८४,५४७ - ४६,१९०

  • महाबळेश्‍वर - ५१,२८४ - ६९,९७९ - २१,०८१

  • माण - १,५६,१३९ - ६५,८४३ - २६,८०९

  • पाटण -२,०४,५४५ - ९५,४०२ - ४३,७७९

  • फलटण - २,३६,८०९ - १,२४,७०३ - ४५,१९९

  • सातारा - ३,५०,०५४ - २,३०,१६१ - १,०८,५५९

  • वाई - १,३३,५७३ - ६१,९५० - ३०,०३५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.