सायगाव (सातारा) : ज्यांना कोणीही नसतो त्यांच्या पाठीशी परमेश्वर असतो. फक्त श्रद्धेबरोबर जिद्दही ठेवावी लागते. या त्रिकाल अबाधित सत्याचा प्रत्यय वेळेमधील (ता. वाई) यशोधन संस्थेच्या (Yashodhan Institute) आश्रमातील अनाथ, बेघरांनी आणि संस्थेचे रवी बोडके (Ravi Bodake) यांनी दिला आहे. या आश्रमातील दहा अनाथ मृत्यूच्या दाढेतून परत आले आहेत. (Coronavirus Was Defeated By Ten Members Of The Yashodhan Institute At Vele Village)
कोरोनाच्या (Coronavirus) मगरमिठीतून कोणीही गरीब श्रीमंत सुटलेला नाही. अनाथांचे आश्रयस्थान असलेल्या यशोधन संस्थेच्या आश्रमातही कोरोनाचा शिरकाव झाला.
कोरोनाच्या (Coronavirus) मगरमिठीतून कोणीही गरीब श्रीमंत सुटलेला नाही. अनाथांचे आश्रयस्थान असलेल्या यशोधन संस्थेच्या आश्रमातही कोरोनाचा शिरकाव झाला. मात्र, रवी बोडके यांनी त्यांचे मनोबल वाढविले. आश्रमातील तब्बल दहा लोकांना कोरोनाची बाधा झाली होती. दहा लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले कळताच या अनाथांचेही धाबे दणाणले. त्यातीलच युवराज हा तर पूर्ण खचून गेला होता. "मी मरणार तर नाही ना,' असे तो आश्रमाचे प्रमुख रवी बोडके यांना म्हणायचा. या कठीण परिस्थितीत श्री. बोडके हे सर्वांना धीर देत राहिले. या बाधितांना औषधोपचारासह सर्व काळजीही त्यांनी घेतली. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दहा जणांपैकी आठ जण नॉर्मल होते. त्यांची ऑक्सिजन लेवल 97 च्या आसपास असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही.
संस्थेच्या आश्रमातच त्यांच्यावर उपचार सुरू केले. वेळच्या वेळी औषधे, योग्य आहाराचे जेवण दिले गेल्याने आत्मविश्वास व मनोबलाच्या जोरावर "यशोधन'ला आपले घर व त्यातील लोकांना आपले कुटुंब समजून सर्वांनी त्यांची सेवा केली. त्यामुळे आठ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. इतर दोन जणांना ऑक्सिजनची गरज पडल्याने कवठे (ता. वाई) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यांनीदेखील हतबल न होता कोरोनाशी मुकाबला केला. त्यामुळे आज सर्वच्या सर्व जण कोरोनावर मात करून संस्थेमध्ये पुन्हा आले आहेत.
दादा तुमी लयं सांभाळलं
ज्या दिवशी सर्व जण "यशोधन'मध्ये परत आले. गाडीतून उतरताच युवराज म्हणाला ""दादा आलो बरं का परत. आता मास्क लावणार. लय घाबरलो होतो.'' त्या रात्री जेवताना मात्र युवराज खूप रडला. "दादा कोणीच नाही मला; पण तुमी लयं सांभाळलं,' असे म्हणत त्याने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्यांसाठी रवी बोडके देवदूतासमान वाटत आहेत.
Coronavirus Was Defeated By Ten Members Of The Yashodhan Institute At Vele Village
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.