आनेवाडी टोलनाका वाद : आमदार शिवेंद्रराजेंसह 48 जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता, काय घडलं होतं 'कोजागरी'च्या रात्री?

याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात (Satara City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosaleesakal
Updated on
Summary

सरकार पक्षाच्या वतीने पाच पोलिस साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात न्यायालयाने दोन्ही बाजूकडून म्हणणे ऐकून घेतले.

सातारा : आनेवाडी टोलनाक्याच्या वादावरून (Anewadi Toll Controversy) झालेल्या गोंधळादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदीचा आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांच्यासह ४८ जणांची जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात (Satara City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसरे तदर्थ जिल्हा सत्र न्यायाधीश साळवे यांनी हा निर्णय दिला आहे. यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने पाच पोलिस साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात न्यायालयाने दोन्ही बाजूकडून म्हणणे ऐकून घेतले. सरकार पक्षाचा युक्तिवाद फेटाळून लावत बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह ४८ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosale
'उदयनमहाराज, ही रणजीची टीम नाही तर IPL टीमचे तुम्हीच मालक आहात'; असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस?

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह ४८ जणांच्या वतीने ॲड. वसंत नारकर, शिवराज धनावडे यांनी कामकाज पाहिले. स्वत: शिवेंद्रसिंहराजे हे निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात हजर होते. सातारा शहरात सहा ऑक्टोबर २0१७ ला कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी हा गोंधळ झाला होता. त्यामध्ये शुक्रवार पेठेत गोळीबारही झाला होता.

Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosale
Sangli Politics : होमग्राऊंडवरच जयंत पाटलांना भाजप नेत्यांचा 'दे धक्का'; राजकीय तर्क-वितर्कांना उधाण

त्यापूर्वी सायंकाळच्या सुमारास शासकीय विश्रामगृहावर जमलेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष ॲड. विक्रम पवार, माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, जयेंद्र चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते रवी पवार, फिरोज पठाण यांच्यासह ४८ जणांच्या विरोधात गुन्हा दखल झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.