वाई (जि. सातारा) : वनक्षेत्रात वणवा लावण्यास कारणीभूत ठरलेल्या रेणावळे जिल्हा परिषद शाळेतील दोघांना वाई न्यायालयाने प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास 20 दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली. शिवाजी लक्ष्मण पारटे (रा. वेलंग) व नीलिमा गणेश खरात (हल्ली रा. रेणावळे) अशी त्यांची नावे आहेत.
वाशिवली वनपरिक्षेत्रामधील रेणावळे येथील राखीव वनक्षेत्रास 26 फेब्रुवारी 21 रोजी दुपारी एकच्या सुमारास वणवा लागला होता. त्या वेळी वेळीच दक्षता घेऊन वनअधिकारी व कर्मचाऱ्यांनी भर उन्हात ही आग विझवली. वणवा कशामुळे पेटला याचा शोध घेतला असता रेणावळे येथे जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात शिक्षक शिवाजी पारटे व नीलिमा खरात यांनी कागद व पालापाचोळा जाळण्यासाठी आग लावली होती. कचऱ्यातील पेटलेले कागद व पालापाचोळा वाऱ्याने उडून शेजारच्या मालकी क्षेत्रात गेला. तेथे मोठ्या प्रमाणात असलेल्या गवताने पेट घेतल्याने जवळच्या रेणावळे गावाचे वनक्षेत्रात आग लागली. त्यामुळे 22 हेक्टर वनक्षेत्र जळून खाक झाले होते. या संशयितांवर वनगुन्हा दाखल करण्यात आला होता.
Video पाहा : साहेब आता मुख्यमंत्री होताहेत, काळजी नाही आता; सेना नेत्याच्या वक्तव्याने राजकीय कार्यकर्त्यांत खळबळ
चिलीम आणि कोंबडीचं रक्त दिलं की धावजी पाटील प्रसन्न होताे...!
उपवनसंरक्षक भारतसिंग हाडा, सहायक वनसंरक्षक गोसावी व वनपरिक्षेत्र अधिकारी महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन वनपाल भाऊसाहेब कदम, प्रभारी वनपाल रत्नकांत शिंदे यांनी वनरक्षक संदीप पवार, प्रदीप जोशी यांच्या मदतीने तपास पूर्ण करून संशयितांविरुद्ध ता. 13 मार्च 21 रोजी आरोपपत्र दाखल केले. या गुन्ह्यातील दोघांना वाई येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले. त्या वेळी त्यांनी गुन्हा कबूल केला. त्या वेळी न्यायालयाने या दोघांना प्रत्येकी 5 हजार रुपये दंड व दंड न भरलेस 20 दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. त्यानुसार त्यांनी 10 हजार रुपये दंडाची रक्कम न्यायालयात भरल्याची माहिती वन विभागाने दिली.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.