काेराेनाचा अहवाल आल्यानंतर कन्या विद्यालय बंद ठेवण्याचा झाला निर्णय

काेराेनाचा अहवाल आल्यानंतर कन्या विद्यालय बंद ठेवण्याचा झाला निर्णय
Updated on

उंब्रज (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यात काेराेना (Covid 19) बाधितांची संख्या दिवसेंदिवस संख्या वाढू लागली आहे. यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे, हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचा अवलंब करणे फार गरजेचे आहे. दरम्यान येथील रूक्मिणी पांडुरंग कदम कन्या विद्यालयातील इयत्ता १० वीच्या वर्गातील एका मुलीस (Student) कोरोनाची बाधा झाली अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार यांनी दिली. परिणामी शाळा व्यवस्थापनाने पुढील आदेश येई पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

येथील कन्या विद्यालयात इयत्ता १० वीच्या वर्गात शिकणारी एक विद्यार्थीनीस कोरोनाची बाधा झाली आहे. तारळे परिसरातील एका गावातील तिच्या नातेवाईकाचा अहवाल कोरोना बाधीत आला होता. या विद्यार्थ्यांनीचे शाळेतील तपासणी दरम्यान शरीराचे तापमान प्रमाणापेक्षा जास्त आढळून आल्याने शाळा प्रशासनाने तात्काळ तिला कोरोनाची चाचणी करण्याची सूचना केली. 

त्यानंतर उंब्रज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तिने वडीलांसह, बहीणीची आर. टी. पी. सी. आर चाचणी केली. तिचा अहवाल पाॅझिटीव्ह आल्याचे डॉ. संजय कुंभार यांनी दिली. याबराेबरच आता संपर्कातील विद्यार्थ्यांनींची कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. तसेच सुरक्षाविषयक म्हणून शाळा व्यवस्थापनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्याध्यापिका जंगम यांनी सांगितले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.